होळ ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:10+5:302021-06-09T04:42:10+5:30

होळ येथील ग्रामसेवक श्रीकांत कांबळे यांच्या जागी मंजूर पदानुसार ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे रखडलेले काम सुरू ...

Sit-in agitation of five members of Hol Gram Panchayat | होळ ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांचे ठिय्या आंदोलन

होळ ग्रामपंचायतच्या पाच सदस्यांचे ठिय्या आंदोलन

Next

होळ येथील ग्रामसेवक श्रीकांत कांबळे यांच्या जागी मंजूर पदानुसार ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे रखडलेले काम सुरू करावे. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी यासह इतर मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य योगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सत्यभामा राख, आश्रूबाई राख, शेषेकला शिंदे, लताबाई घुगे या सदस्यांसह भाऊसाहेब राख, तुकाराम घुगे, ज्ञानोबा शिंदे आदींनी ठिय्या आंदोलन केले.

आंदोलनाची दखल घेत ग्रामविकास अधिकाऱ्याचे रिक्त पद चार दिवसात भरू असे लेखी आश्वासन प्रभारी गटविकास अधिकारी आर.एस. कांबळे यांनी दिले. तसेच, १५ दिवसात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे मूल्यांकन करून निधी मागणीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. बांधकामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचे लेखी आश्वासन जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता सय्यद यांनी दिले. आरोग्य उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून पुन्हा नेमणूक करण्याचे आदेश दिले. रिक्त पदे भरून आरोग्य सेवा सुरळीत करण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास आठवले यांनी आश्वासन दिले. सहायक गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे, विस्तार अधिकारी बाबूराव राऊत, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सय्यद यांच्या उपस्थितीत पत्र दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

सभापती, उपसभापतींची मध्यस्थी

होळ येथील ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन सभापती पती विष्णू घुले, उपसभापती ऋषिकेश आडसकर यांच्या मध्यस्थीने व मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता गिरी, तहसीलदार लक्ष्मण धस यांच्या सूचनेवरून प्रश्न मार्गी लागले. त्याबद्दल पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

===Photopath===

080621\deepak naikwade_img-20210608-wa0033_14.jpg

Web Title: Sit-in agitation of five members of Hol Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.