बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये ११५ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:07 AM2019-10-08T00:07:31+5:302019-10-08T00:10:57+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार अंतिम दिवस होता. यावेळी सहा विधानसभा मतदारसंघात छानणीनंतर २०२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते.

Six candidates are contesting in six constituencies in Beed district | बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये ११५ उमेदवार रिंगणात

बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये ११५ उमेदवार रिंगणात

Next
ठळक मुद्देविधानसभा रणधुमाळी : ८७ जणांची माघार - जिल्हाधिकारी

बीड : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवार अंतिम दिवस होता. यावेळी सहा विधानसभा मतदारसंघात छानणीनंतर २०२ उमेदवारी अर्ज वैध ठरले होते. पैकी ८७ उमेदवारांनी माघार घेतली असून, ११५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय म्हणाले, सहा विधानसभा मतदारसंघासाठी तीन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेवराई व माजलगाव - सारादिंदु चौधरी, बीड व आष्टी - प्रांजल यादव, केज व परळी - इस्त्राईल इंगटी तसेच पोलीस निरीक्षक म्हणून बाबूलाल मीना यांचा समावेश आहे. नागरिकांना निवडणुकीसंदर्भात काही अडचणी किंवा तक्रार असेल तर त्यांच्याशी संपर्क करु शकतात. २१ आॅक्टोबर रोजी मतदानादिवशी सुटी जाहीर आहे. नागरिकांनी लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी होऊन हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी केले.
छाननीनंतरची अंतिम उमेदवार संख्या
मतदारसंघ           वैध अर्ज       माघार       अंतिम
गेवराई                    28               9              19
माजलगाव               56             31              25
बीड                       51               1 7               34
आष्टी                      24               15                 9
परळी                     28               12              16
केज                        15                 3              12
एकूण                     202           87              115

Web Title: Six candidates are contesting in six constituencies in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.