इंग्रजीच्या परीक्षेत सहा कॉपीबहाद्दर रस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:20 AM2020-02-19T00:20:22+5:302020-02-19T00:20:58+5:30
इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज मंगळवार पासून सुरु वात झाली असून इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर ५ तर तर डोईठाण येथे एका विद्यार्थ्यावर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली.
कडा : इयत्ता बारावीच्या परीक्षेस आज मंगळवार पासून सुरु वात झाली असून इंग्रजी विषयाच्या पेपरला कॉपी करताना आढळलेल्या आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालय परीक्षा केंद्रावर ५ तर तर डोईठाण येथे एका विद्यार्थ्यावर रस्टिकेटची कारवाई करण्यात आली.
आष्टी तालुक्यात बारा केंद्रावर ४ हजार ८८४ विद्यार्थी परीक्षा देत असून कॉपी रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. दरम्यान बीड येथील उपशिक्षणाधिकारी सोनवणे व आष्टीचे धनंजय शिंदे यांच्या भरारी पथकाने पाहणीदरम्यान एकूण सहा विद्यार्थी कॉपी करताना आढळले. त्यांच्यावर बोर्डाच्या नियमाप्रमाणे कारवाई केली. या पथकात तुकाराम पवार,डी. व्ही.धोतरे, बाबासाहेब मुळीक, बाबासाहेब पवार, एस. डी. आव्हाड, विकास मेहेत्रे, रत्नाकर चव्हाण यांचा समावेश होता.
केंद्र संचालकास नोटीस
आष्टी तालुक्यातील देऊळगाव घाट येथील ज्ञानेश्वर विद्यालयातील परीक्षा केंद्रावर एकाच वेळी पाच विद्यार्थी कॉपी करताना पकडले. केंद्रसंचालकास नोटीस देणार असल्याचे बीईओ धनंजय शिंदे यांनी सांगितले.