परळीच्या विलगीकरण केंद्रातून सहा जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:36 AM2021-05-20T04:36:36+5:302021-05-20T04:36:36+5:30
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कोरोना बाधित महिला व लहान मुलांसाठी १०० बेडचे मोफत विलगीकरण केंद्र सुरू केलेले ...
पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कोरोना बाधित महिला व लहान मुलांसाठी १०० बेडचे मोफत विलगीकरण केंद्र सुरू केलेले आहे. या केंद्रात भरती झालेल्या रूग्णांची संपूर्ण काळजी घेतली जात आहे. तज्ज्ञ डाॅक्टरांकडून तपासणी, औषधोपचार, पौष्टिक आहार, योगा, प्राणायाम हे नित्यनियमाने घेतले जाते. बारीकसारीक सोयी, सुविधांवर पदाधिकारी लक्ष देतात. सेंटरमधील सकारात्मक वातावरणामुळे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. माजी नगरसेवक रवी मुळे हे पूर्णवेळ लक्ष देत आहेत. नुकतेच सहा रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले. सेंटरमधून परतताना डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, डॉ. आनंद टिंबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, शहर सरचिटणीस अनंत इंगळे आदींनी रूग्णांना सुदृढ आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या, तसेच काळजी घेण्यासही सांगितले.
फोटो : परळी येथील महिला व बालकांच्या विलगीकरण केंद्रातून कोरोनामुक्त बालकाचे डॉ. गुरुप्रसाद देशपांडे, डॉ. आनंद टिंबे यांनी कौतुक केले.
===Photopath===
190521\img-20210519-wa0490_14.jpg