अंबिका चौक-करपरा नदी रस्त्यासाठी सहा कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:34 AM2021-04-04T04:34:40+5:302021-04-04T04:34:40+5:30

बीड : गेल्या तीस वर्षांत जी विकासकामे झाली नाहीत, ती विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून, बीड मतदारसंघासाठी ३० कोटींपेक्षा ...

Six crore sanctioned for Ambika Chowk-Karpara river road | अंबिका चौक-करपरा नदी रस्त्यासाठी सहा कोटी मंजूर

अंबिका चौक-करपरा नदी रस्त्यासाठी सहा कोटी मंजूर

googlenewsNext

बीड : गेल्या तीस वर्षांत जी विकासकामे झाली नाहीत, ती विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असून, बीड मतदारसंघासाठी ३० कोटींपेक्षा अधिक निधी अर्थसंकल्पातून खेचून आणला. बीड शहरातील अंबिका चौक ते करपरा नदी, खापरपांगरी रस्त्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर करून घेतले. परंतु, कुठलेही काम न करता श्रेय घेण्यासाठी पुढे असलेल्या बीडचे नगराध्यक्ष आणि माजी मंत्र्यांनी मात्र आपणच काम मंजूर केल्याचा बनाव केला, आमदार संदीप क्षीरसागर बीड मतदारसंघातील रस्ते सुधारणा कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. ही मागणी करत असताना सदर कामाचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग बीड यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता उस्मानाबाद मंडळ यांच्याकडे माझ्या नावासह दाखल झाला. सदर प्रस्ताव उस्मानाबाद येथून २०२१-२२ या आर्थिक वर्षात मार्च २१ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कार्यसीन अधिकारी नियोजन १ सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आला. सदर कामे विधी मंडळाचे सदस्य सूचित करतात. ५० कोटींपेक्षा अधिक रस्ते सुधारणासाठी कामे सूचित करून सदर प्रस्ताव मी दाखल केले होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ३० कोटींपेक्षा अधिक निधी बीडच्या पदरी पाडून घेतला. परंतु, कोणतेही प्रयत्न न करता, पत्रव्यवहार न करता अर्थसंकल्पातील कामे आपणच मंजूर केला असल्याचा बेबनाव करत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे अंबिका चौक-खापरपांगरी रस्त्याचे श्रेय घेऊ लागले आहेत, असे आमदार संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

मंजूर करून घेतलेली कामे

बीड शहरातील पोलीस मुख्यालयाच्या पाठीमागील अंकुशनगरकडे जाणाऱ्या पुलासाठी तीन कोटी रुपये, म्हाळसजवळा-जरूड-बोेरफडी-येळंब-चौसाळा रस्त्यावरील पूल बांधकाम करणे दीड कोटी, माळापुरी-कुर्ला-नाथापूर रस्ता अडीच कोटी रुपये, बोरखेड-रौळसगाव-खडकीघाट-सावरगाव रस्त्यावर पूल बांधकाम एक कोटी रुपये, अंजनवती-मोरगाव-रामा -उदंडवडगाव-नेकनूर दीड कोटी रुपये, बीड-म्हाळसजवळा-पात्रुड रस्ता सुधारणा अडीच कोटी रुपये, डोंगरकिन्ही-रायमोहा-खालापुरी-साक्षाळपिंप्री-सिरसमार्ग रस्ता दोन कोटी रुपये, आयटीआय इमारत आठ कोटी, बेलुरा-नारायणगड रस्ता सुधारणा एक कोटी रुपये आदी कामांचा यात समावेश आहे.

===Photopath===

030421\032_bed_4_03042021_14.jpg

===Caption===

Sandeep

Web Title: Six crore sanctioned for Ambika Chowk-Karpara river road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.