सहा दिवस तुंबलेली गर्दी उसळली, मोंढ्यात चार तास वाहतूक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:34 AM2021-05-12T04:34:52+5:302021-05-12T04:34:52+5:30

बीड : रमजान ईद आणि अक्षय तृतीया सण तीन दिवसांवर आलेले असताना, सहा दिवसांपासूनच्या कडक लॉकडाऊनमुळे मंगळवारी शिथिल ...

The six-day-long crowd erupted, with a four-hour traffic jam | सहा दिवस तुंबलेली गर्दी उसळली, मोंढ्यात चार तास वाहतूक जाम

सहा दिवस तुंबलेली गर्दी उसळली, मोंढ्यात चार तास वाहतूक जाम

Next

बीड : रमजान ईद आणि अक्षय तृतीया सण तीन दिवसांवर आलेले असताना, सहा दिवसांपासूनच्या कडक लॉकडाऊनमुळे मंगळवारी शिथिल वेळेत शहरातील भाजी मंडई तसेच जुना मोंढा भागात मोठी गर्दी उसळली. पुन्हा लॉकडाऊन झाले, तर काय? या धास्तीमुळे ग्रामीण भागातून किरकोळ व्यापारी तसेच शहरातील ग्राहकांनी एकच गर्दी केल्याने कोरोनाचे नियम आपोआप पायदळी तुडविल्याचे निदर्शनास आले.

जुना मोंढा भागाकडे येणाऱ्या एमआयडीसी रोडवर वृंदावन गार्डनपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती; तर मसरतनगरकडून येणाऱ्या मार्गावर अमरधामपासून मोंढ्यापर्यंत तसेच डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून ते मोंढयापर्यंत वाहनांच्या रांगा, मालवाहू वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मोंढ्याकडे जाण्यासाठी असलेल्या अन्य रंगार गल्ली, विप्रनगरकडून येणारा, शीतल कॉर्नर, करीमपुराकडून विठ्ठल मंदिर चौकातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे चार तासांपासून वाहनचालक, व्यापारी ताटकळले. वाहतूक कोंडीतच दहा वाजता शिथिल वेळ संपल्याने पोलिसांचे दुकाने बंद करण्यासाठी आवाहनाचे काम सुरू झाले. दरम्यान, सुभाष रोड, कारंजा, बलभीम चौक भागातही प्रतिबंधित दुकाने अर्धवट शयर उघडून सुरू होती.

--------

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन उपाययोजना करत असले तरी सण लक्षात घेता, सवलतीचा अवधी केवल तीन तासच दिल्याने तसेच पुन्हा लॉकडाऊन लागू झाले, तर काय? या भीतीपोटी खरेदीसाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. याबाबतचे संकेत ९ मे रोजीच्या वृत्तात ‘लोकमत’ने दिले होते; तर लॉकडाऊन कालावधीत पहाटे दुकाने उघडून अनेकांनी व्यापार केला.

संबंधितांवर कारवाया झाल्या तरीदेखील मंगळवारी पहाटेपासून दुकाने उघडून व्यापार केल्याचे ऐकायला मिळाले. किमान बुधवारी प्रशासनाने गर्दी तसेच वाहतूक नियंत्रणासाठी उपाय करण्याची गरज आहे.

-------------

Web Title: The six-day-long crowd erupted, with a four-hour traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.