आजपासून सहा दिवस ‘आयजी’ बीड मुक्कामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 11:31 PM2018-11-26T23:31:09+5:302018-11-26T23:32:37+5:30
औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ हे मंगळवारपासून सहा दिवस बीड जिल्ह्यात आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक व पोलीस ठाण्यांची तपासणी करण्यासाठी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याळ हे मंगळवारपासून सहा दिवस बीड जिल्ह्यात आहेत. ते वार्षिक आढावा घेणार आहेत. आज-उद्या असे म्हणत आठवड्यापासून दौरा पुढे ढकलत होता. अखेर मंगळवारी तो निश्चित झाला आहे.
अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून तपासणीला सुरूवात होणार असून नंतर अंबाजोगाई पोलीस ठाणे, त्यानंतर बीड पोलीस अधीक्ष कार्यालय, उपविभागीय कार्यालय, पिंपळनेर पोलीस ठाणे, गेवराई उपविभागीय कार्यालय अशी तपासणी करणार आहेत. माजलगाव उपविभागालाही अचानक भेट देण्याची शक्यता आहे.
पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बो-हाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्यासोबत असणार आहेत. आपल्याकड काही त्रुटी आढळणार नाहीत, यासाठी ठाणे प्रमुखांनी काळजी घेतली आहे. आठवड्यापासून त्यांच्याकडू तयारी केली जात होती. आता कोण दोषी ठरते आणि कोणाचे काम चांगले, हे दौऱ्याअंतीच समजणार आहे. या तपासणीमुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सुट्टयाही रद्द झाल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.