डेंग्यू झालेल्या सहा बालकांवर उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:23+5:302021-07-19T04:22:23+5:30
धारूर : शहरात कसबा भागात आठ दिवसांपासून डेंग्यूचा फैलाव झाला असून दहा बालके डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर ...
धारूर : शहरात कसबा भागात आठ दिवसांपासून डेंग्यूचा फैलाव झाला असून दहा बालके डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर केज येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी चार बालकांना सुटी देण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी साथ रोग नियंत्रण पथकासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शहाजी लोमटे यांनी शहरात भेट देऊन २६ ठिकाणी स्थळ पाहणी केली. यापैकी बहुतांशी ठिकाणे दोषी आढळल्याने आरोग्य विभागाच्या वतीने ॲबेटिंग करण्यात आली. यावेळी नागरिकांना दक्षता बाळगण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सोमवारी या भागातील संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेणार असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लोमटे यांनी सांगितले. नगर परिषद व आरोग्य विभाग संयुक्तपणे या भागात मोहीम राबवून सर्वेक्षण करून उपाययोजना हाती घेणार असल्याचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी सांगितले.