शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:04 AM2021-02-21T05:04:57+5:302021-02-21T05:04:57+5:30

अंबाजोगाई : शहरातील रुख्माईनगर भागात राहणाऱ्या धारूरच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सासऱ्यासह इतर ...

Six father-in-law charged in teacher suicide case | शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा

शिक्षकाच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या सहा जणांवर गुन्हा

Next

अंबाजोगाई : शहरातील रुख्माईनगर भागात राहणाऱ्या धारूरच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सासऱ्यासह इतर चार जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मनोजकुमार प्रभाकर पोटभरे नामक शिक्षकाने गुरुवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली होती. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अंबाजोगाई शहरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, कर्मचारी कल्याण देशमाने, फुके यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाजवळ आत्महत्या करण्यापूर्वी शिक्षकाने लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर शुक्रवारी दुपारी मनोजकुमार पोटभरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चिठ्ठी सापडल्याने आत्महत्येचे रहस्य उलगडले

शिक्षक मनोजकुमार पोटभरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासरा बीड येथील संत नामदेव नगर भागातील शंकर गेणाजी वावळकर, सासू, मेहुणा व मेहुण्याची बायको हे माझ्या आत्महत्येस जबाबदार असून, माझ्या पत्नीला सासरी पाठवत नव्हते. मुलाबाळांना भेटू देत नव्हते. त्यामुळे मला मानसिक त्रास होऊ लागला होता. माझ्या आत्महत्येस सासरकडील मंडळी जबाबदार असल्याचे म्हटले आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरा, सासू, पत्नी, मेहुणा व मेहुण्याची बायको यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी, रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे करीत आहेत.

Web Title: Six father-in-law charged in teacher suicide case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.