मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:38 AM2021-09-23T04:38:28+5:302021-09-23T04:38:28+5:30

केज : बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प मंगळवारी दुपारी तुडुंब भरल्याने कालव्यातून ...

The six gates of the Manjara Dam opened | मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले

मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले

Next

केज : बीडसह उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बहुतांशी भागाचा प्रमुख जलस्त्रोत असणारा मांजरा प्रकल्प मंगळवारी दुपारी तुडुंब भरल्याने कालव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसाने धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली. त्यामुळे बुधवारी सकाळी ६ वाजता धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, पाणी नदीपात्रात सोडण्यात आले.

मांजरा धरणाची साठवण क्षमता २२४ दलघमी आहे. मंगळवारी सकाळपर्यंत या धरणात २२३.६२५ दलघमी साठा होता. त्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी दुपारी १ वाजता उजव्या कालव्यातून १.२७ प्रतिसे.घ.मी. वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दुपारनंतर मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने वाढली आणि बुधवारी पहाटेपर्यंत धरणात २२५.५ दलघमी पाणीसाठा झाला. त्यामुळे सकाळी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, प्रतिसेकंद १४९.८० घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला.

220921\22_2_bed_21_22092021_14.jpeg

मांजरा धरणाचे सहा दरवाजे बुधवारी उघडले. त्यानंतर पाण्याचा असा मोठा विसर्ग होत होता.

Web Title: The six gates of the Manjara Dam opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.