मांजरा धरणाचे पुन्हा सहा दरवाजे दोन मीटरने उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:36 AM2021-09-27T04:36:53+5:302021-09-27T04:36:53+5:30

अंबाजोगाई : तालुक्यातील मांजरा धरणाच्या वरच्या भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात शनिवारी रात्री तुफान पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक पुन्हा ...

The six gates of the Manjara Dam opened again by two meters | मांजरा धरणाचे पुन्हा सहा दरवाजे दोन मीटरने उघडले

मांजरा धरणाचे पुन्हा सहा दरवाजे दोन मीटरने उघडले

Next

अंबाजोगाई : तालुक्यातील मांजरा धरणाच्या वरच्या भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात शनिवारी रात्री तुफान पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पाणीसाठा वाढू लागल्याने रविवारी दुपारी १ वाजता धरणाचे सहा दरवाजे पुन्हा दोन मीटरने उचलण्यात आल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मांजरा धरणात अतिवेगाने पाण्याची आवक सुरू झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी धरणाचे सहा दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले होते. अतिपावसामुळे आधीच शेतीचे नुकसान झाले असताना धरणातून पाणी सोडल्याने शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे दरवाजे केवळ ०.२५ मीटर उंचीपर्यंत उघडे ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री मांजरा धरणाच्या वरच्या भागासह वाघेबाभूळगाव, नांदूरघाट परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि धरणात ३५ हजार ८९३ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढू लागल्याने रविवारी दुपारी १ वाजता धरणाचे सहा दरवाजे टप्प्याटप्प्याने दोन मीटरपर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यातून नदीपात्रात सध्या ३५ हजार ९६८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आवश्यकता भासल्यास दरवाजे आणखी उघडण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पुराचा धोका अद्याप कमी झालेला नाही.

अंजनपूर बंधाऱ्याचा पाचवा दरवाजा तुटला

दरम्यान, धरणातून पाणी सोडल्याने दोन दिवसापासून नदीला पूर आलेला आहे. पाण्याच्या दबावामुळे अंजनपूर-कानडी बोरगाव येथील बंधाऱ्याचे चार दरवाजे मागील दोन दिवसात तुटले होते. रविवारी दुपारी बंधाऱ्याचा पाचवा दरवाजा देखील तुटला आहे.

डाव्या कालव्याच्या लाईनिंगचे काम पूर्ण करावे

मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याचे लाईनिंगचे काम अर्धवट आहे. त्यामुळे सिंचनासाठी डाव्या कालव्याने पाणी सोडता यावे यासाठी सदर अर्धवट काम तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावेत अशी विनंती आ. नमिता अक्षय मुंदडा यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केली आहे.

260921\img-20210925-wa0113.jpg

मांजरा धरण

Web Title: The six gates of the Manjara Dam opened again by two meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.