सहा मुख्याध्यापक झाले शिक्षण विस्तार अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:09+5:302021-05-11T04:36:09+5:30
बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहा मुख्याध्यापकांना शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-३ या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्य ...
बीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील सहा मुख्याध्यापकांना शिक्षण विस्तार अधिकारी श्रेणी-३ या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार १०मे रोजी ही पदोन्नती व पदस्थापना देण्यात आली आहे.
केज तालुक्यातील कुंबेफळ येथील जि. प. शाळेचे मुख्याध्यापक रावण नागोराव हंडिबाग यांची अंबाजोगाई गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नियुक्ती केली आहे. तर दिंद्रुड जि. प. कें. प्राथमिक शाळेच्या मख्याध्यापक स. वहिदा बेगम स. जब्बार यांची माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पदस्थापना करण्यात आली. बीड तालुक्यातील तांदळवाडी जि. प. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक अशोक सूर्यभान जगताप यांची पाटाेदा गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नियुक्ती झाली आहे. केज तालुक्यातील उमरी येथील जि. प. शाळेच्या मुख्याध्यापक रेखा भानुदास माने यांची केज गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पदस्थापना झाली आहे. नवगण राजुरी जि. प. कें. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक अभिमान लिंबाजी बहीर यांना बीड गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पदस्थापना देण्यात आली आहे. उपशिक्षणाधिकारी अजय बहीर यांचे ते वडील आहेत. बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथील जि. प. कें. प्रा. शाळेचे मुख्याध्यापक अरुण रामभाऊ लोमटे यांची माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली.