सहा तासांच्या अवधीमुळे बाजार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:34 AM2021-03-31T04:34:32+5:302021-03-31T04:34:32+5:30

जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिकांनी ...

The six-hour period made the market smooth | सहा तासांच्या अवधीमुळे बाजार सुरळीत

सहा तासांच्या अवधीमुळे बाजार सुरळीत

Next

जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिकांनी मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारपासून सहा तासांचा शिथिल वेळ दिल्याने सकाळपासूनच बाजारातील सर्व दुकाने, लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले. काही ठिकाणी लोक अनावश्यक गर्दी करीत असल्याचे दिसून आले. प्रशासनाने सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही नागरिकांमध्ये हलगर्जीपणा दिसून आला.

सवलत देऊनही दुकाने उघडी

दुपारी एक वाजेपर्यंतची वेळ असल्याने पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून दुकाने बंद करण्याची सूचना केली. सहा तासांची ढील देऊनही काही दुकाने सुरू होती. पोलिसांनी समज देऊन आणि प्रशासनाने सवलत देऊनही नियमांचे पालन न झाल्यास व्यापाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोनाला रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: The six-hour period made the market smooth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.