बीड जिल्ह्यात ‘बीडीओ’विना चालतात सहा पंचायत समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 12:31 AM2018-08-06T00:31:55+5:302018-08-06T00:36:32+5:30

बीड जिल्ह्यातील ११ पैकी ३ पंचायत समितींचा कारभार गटविकास अधिकाऱ्यांविना सुरू आहे. तसेच इतर तीन पंचायत समिती गटविकास अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. अधिकारी नसल्यामुळे पंचायत समितींमध्ये कामकाज सुरळीत होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील विकासांच्या कामांना खीळ बसत असल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे.

Six Panchayat Samiti running without BDO in Beed district | बीड जिल्ह्यात ‘बीडीओ’विना चालतात सहा पंचायत समिती

बीड जिल्ह्यात ‘बीडीओ’विना चालतात सहा पंचायत समिती

googlenewsNext

बीड : जिल्ह्यातील ११ पैकी ३ पंचायत समितींचा कारभार गटविकास अधिकाऱ्यांविना सुरू आहे. तसेच इतर तीन पंचायत समिती गटविकास अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. अधिकारी नसल्यामुळे पंचायत समितींमध्ये कामकाज सुरळीत होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील विकासांच्या कामांना खीळ बसत असल्याचे सरपंचांचे म्हणणे आहे.

बीड जिल्ह्यात ११ पंचायत समिती आहेत. त्यापैकी परळी, आष्टी, शिरुर, माजलगाव व वडवणी या पाच पं. स. मध्येच गटविकास अधिकारी कार्यरत आहेत. अंबाजोगाई, वडवणी, व धारुर येथील गटविकास अधिकारी यांची इतर जिल्ह्यात बदली झाली आहे. तसेच बीड, केज व पाटोदा या पंचायत समितींचा कारभार गत अनेक महिन्यांपासून गटविकास अधिका-यांविना सुरू आहे. याठिकाणी गटविकास अधिकारी पदावर इतर विभागातील अधिका-यांना प्रभारी पद दिले आहे.

प्रभारी पदभार असणा-या अधिका-यांना त्याच्या विभागातील कामाचा ताण असल्यामुळे त्यांना पंचायत समितीमध्ये पूर्णवेळ लक्ष देता येत नाही. त्यामुळे ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात खीळ बसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण विकासाची व्यवस्था ही पंचायत समितीवर अवलंबून आहे. त्यामुळे कायमस्वरुपी गटविकास अधिकारी देण्याची मागणी अनेक वेळा ग्रामस्थांकडून करण्यात आली होती.

नांदेड येथे कार्यरत असलेल्या अधिका-यांची बदली होऊन त्यांना बीड पंचायत समितीमध्ये पदभार घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ते अद्याप रुजू झालेले नाहीत. असाच प्रकार केज आणि पाटोदा पंचायत समितीमध्ये घडला. सध्या दुस-या विभागातील अधिकाºयांना येथील प्रभारी पदभार सोपवण्यात आलेला आहे.

येथे येण्यास अधिकारी आहेत अनुत्सुक
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील कार्यपद्धती, तसेच राजकीय नेत्यांचा वाढता हस्तक्षेप, पदावर कार्यरत असलेल्या अधिकाºयांवर येत असलेला दबाव या कारणांमुळे इतर जिल्ह्यातील अधिकारी बीड जिल्ह्यात नेमणूक अथवा बदली दिलेली असतानाही रुजू होण्यास धजावत नाहीत किंवा अनुत्सुक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रुजू न होताच करुन घेतली बदली
बीड, केज, पाटोदा या पंचायत समितीमध्ये इतर जिल्ह्यातील गटविकास अधिकाºयांना पदभार घेण्यास सांगितले होते. मात्र, ते नेमलेल्या ठिकाणी रुजू झालेच नाहीत. दरम्यानच्या काळात त्यांनी इतर ठिकाणी स्वत:ची बदली करुन घेतल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

बदली झाली, कार्यमुक्त मात्र नाही
जिल्ह्यातील अंबाजोगाई, वडवणी, गेवराई या पंचायत समितीमधील गटविकास अधिकारी तसेच नरेगा गटविकासअधिकारी सुधीर भागवत यांची बदली झाली आहे. मात्र, त्यांच्या जागेवर इतर ठिकाणचे अधिकारी अद्याप रुजू न झाल्यामुळे त्यांना जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अद्यापही कार्यमुक्त केलेले नाही.

 

Web Title: Six Panchayat Samiti running without BDO in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.