जिल्ह्यात गाडी चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या सहा जणांनी गमविला आपला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:33 AM2021-07-29T04:33:18+5:302021-07-29T04:33:18+5:30
बीड : मोबाइल हा संपर्काचे एक प्रमुख साधन बनले आहे; परंतु अनेक जण या मोबाइलचा वापर वाहन चालविताना ...
बीड : मोबाइल हा संपर्काचे एक प्रमुख साधन बनले आहे; परंतु अनेक जण या मोबाइलचा वापर वाहन चालविताना करत असल्याचे दिसून येते. यामुळे अनेक वेळा अपघात होऊन वाहनचालकास जीवदेखील गमवावा लागला आहे. गाडी चालविताना मोबाइल वापरू नये, अशा सूचना वाहतूक शाखेकडून वेळोवेळी दिल्या जातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मोबाइलवर बोलणाऱ्या ६ वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे.
ब्रेथ ॲनालायझरवरील धूळ हटेना
कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे वाहनचालकांनी दारू पिलेली आहे का, हे तपासण्यासाठी असलेले ब्रेथ ॲनालायझरचा वापर बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यावरील कारवाया थंडावल्या आहेत. त्यामुळेदेखील अपघातात वाढ होत असल्याचे चित्र आहे.
हेल्मेट नसल्याने मृत्यू
३९
महामार्गावर किंवा दररोड दुचाकीवर प्रवास असेल, तर अपघात झाला तरी प्राण वाचावा, यासाठी हेल्मेट महत्त्वाचे आहे. सर्वांनी हेल्मेटचा वापर केल्यास अपघातातील मृत्यूची शक्यता कमी होते. त्यासंदर्भात पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी सूचना केली जाते. त्यामुळे सर्वांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.
हेल्मेटमुळे मणक्याचा आजार होतो, असा गैरसमज काही जणांमध्ये आहे; मात्र चांगल्या प्रतिचे हेल्मेट वापरल्यास असे आजार बळवत नाहीत.
२०२१ मध्ये जिल्ह्यात झालेले अपघात
रोड अपघात ३१५
जखमी २४५
मृत्यू २०५
या वर्षातील कारवाया
वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे - २८०८
विना हेल्मेट गाडी चालविणे -१५०२
विना सिटबेल्ट -१२१६५
नो पार्किंग -१७१०
ट्रिपरल सीट १७५६
विना लायसेन्स १३०४