धुळे - सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघातात सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 12:30 AM2019-04-13T00:30:43+5:302019-04-13T00:32:06+5:30
चालकाचा ताबा सुटल्याने पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर जीप धडकली. या दोन वाहनांमध्ये एक दुचाकीही येऊन तिहेरी अपघात घडला. यात सहा जण जखमी झाले असून, पैकी एक गंभीर जखमी आहे.
गेवराई : चालकाचा ताबा सुटल्याने पंक्चर काढण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर जीप धडकली. या दोन वाहनांमध्ये एक दुचाकीही येऊन तिहेरी अपघात घडला. यात सहा जण जखमी झाले असून, पैकी एक गंभीर जखमी आहे. हा अपघात धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराईपासून जवळच असलेल्या कॅ. कृष्णाकांत पेट्रोल पंपासमोर शुक्रवारी साडेचार वाजता घडला. जखमीवर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शामराव मुळे, शेख फत्तू शे.मासम, उद्धव उबाळे, अरविंद मुळे, सोमेश्वर नाईकवाडे हे गेवराईहून कांबी येथे जीपने जात होते.
धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कॅ. कृष्णकांत पेट्रोल पंपासमोर चालकाचा ताबा सुटल्याने त्यांची जीप पंक्चर झालेल्या ट्रकला धडकली. यावेळी ट्रक आणि जीपमध्ये मोटारसायकलस्वार मनोहर नाईकवाडे (रा. खांडवी) हे आले. तेही या अपघातात जखमी झाले.
जखमींना गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीडला हलविण्यात आले आहे. अपघातात शेख फत्तू शे.मासम गंभीर जखमी झाले आहेत तर इतर पाच जण जखमी आहेत. घटनास्थळी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दाखल होत वाहतूक सुरळीत केली.