दगडफेक करणाऱ्या ३१ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:16 AM2019-12-22T00:16:21+5:302019-12-22T00:17:05+5:30

येथे शुक्रवारी बीडमध्ये झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी ३१ जणांना अटक केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून इतरांचा शोध सुरू आहे.

Six stoned, arrested | दगडफेक करणाऱ्या ३१ जणांना अटक

दगडफेक करणाऱ्या ३१ जणांना अटक

Next
ठळक मुद्देहर्ष पोद्दार। यापुढे मोर्चा-आंदोलनाला परवानगी नाही

बीड : येथे शुक्रवारी बीडमध्ये झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी ३१ जणांना अटक केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून इतरांचा शोध सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषदेत शनिवारी केले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोनि भारत राऊत, विलास हजारे यांची उपस्थिती होती. यावेळी पोद्दार म्हणाले, शहरात कॅब आणि एनआरसी संदर्भातील समर्थन अथवा विरोधातील मोर्चांना व आंदोलनाला पोलिसांकडून परवानगी मिळणार नाही. जिल्हाभरात पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नियोजन केले होते. मात्र, काही ठिकाणी कायदा हातात घेण्यात आला. तेथे कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. ताब्यात घेतलेले तरुण हे १८ ते २३ वर्ष वयोगटातील असून एकूण ८० ते १०० जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक
दगडफेकीमागे काही पक्ष किंवा संघटनांचा संबंध आहे की, नाही हे तपासादरम्यान निष्पन्न होईल असे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार म्हणाले. बीडमध्ये निर्माण झालेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अपर अधीक्षक विजय कबाडे, उपाधीक्षक भास्कर सावंत यांच्यासह शहरातील सर्व ठाणे प्रमुखांनी आणि पोलीस कर्मचाºयांनी यशस्वी कामगिरी केली त्याबद्दल त्यांचे पोद्दार यांनी कौतुक केले. कौशल्यपूर्ण काम करीत परिस्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल एसआरपीएफच्या तुकडीला रिवार्ड जाहीर केले असल्याचेही यांनी सांगितले.

Web Title: Six stoned, arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.