छोटी गावे ही सुरक्षिततेसाठी सरसावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:35 AM2021-04-28T04:35:54+5:302021-04-28T04:35:54+5:30

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात व परिसरातील कोरोनाची परिस्थिती पाहता, मौजे धानोरा(बु) येथे ग्रामपंचायतमार्फत तीन दिवसीय जनता कर्फ्यूचा निर्णय ...

Small villages rushed for safety | छोटी गावे ही सुरक्षिततेसाठी सरसावली

छोटी गावे ही सुरक्षिततेसाठी सरसावली

Next

अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात व परिसरातील कोरोनाची परिस्थिती पाहता, मौजे धानोरा(बु) येथे ग्रामपंचायतमार्फत तीन दिवसीय जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाला ग्रामस्थांचा ही मोठा सहभाग लाभला.

हा जनता कर्फ्यू २६ एप्रिल ते २८ एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. २६ व २७ रोजी गावकऱ्यांनी व व्यावसायिकांनी बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

गावातील प्रत्येक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली होती. दररोज बस स्थानकवर गर्दी करणारी गावातील जनता आज आपल्या घरात बसून सहकार्य करत होती. गावातील पानटपरी, किराणा दुकान, चहाचे दुकान, कपड्याचे दुकान इत्यादी गर्दीची ठिकाणे आज बंद होती. गावातील नागरिकही कामाशिवाय घराबाहेर न पडता, घरी राहून या परिस्थितीला सहकार्य करत आहेत. हा जनता कर्फ्यू २६ ते २८ कालावधीत आयोजित आहे. गावचे सरपंच सीताबाई भगवान चिवडे, उपसरपंच मेघराज सोमवंशी, ग्रामसेवक दिघे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब फोलाने, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर काळुंके यांनी सर्व गावकऱ्यांना घरी राहून सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. या जनता कर्फ्यूद्वारे धानोरा ( बु ) या गावाने तालुक्यातील इतर गावांसमोर एक चांगले उदाहरण दिले आहे. याद्वारे आज खेड्यात वाढत जाणारा कोरोना या आजारावर आळा बसण्यास सुरुवात होऊ शकते.

===Photopath===

270421\img-20210426-wa0138_14.jpg

Web Title: Small villages rushed for safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.