...म्हणून धनंजय मुंडेंनी परळीतील सभा केली रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 02:39 PM2019-04-12T14:39:56+5:302019-04-12T14:41:39+5:30
बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती.
परळी : लोकसभा निवडणुकीसाठी सध्या रणसंग्राम सुरु आहे. बीड लोकसभा मतदारसंघातील परळी शहरात गुरुवारी सायंकाळी गणेशपार या नावाजलेल्या भागात विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची रात्री आठ वाजता जाहीर सभा होती. यावेळी सभेला अनेकांनी हजेरी लावली होती. मात्र, यासभेला धनंजय मुंडे आले आणि त्यांनी चक्क व्यासपीठावर येऊन ही सभा रद्द केल्याचे जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
यावेळी धनंजय मुंडे यांनी सभेतील संचलन कर्त्याच्या हातातला माईक हातात घेत मला माफ करा मी आज येथे भाषण करायला आलेलो नाही. पुन्हा कधीतरी नक्कीच येईन. तुमच्याशी बोलण्यापेक्षा मला आज एका गोष्टीचे वाईट वाटत आहे की या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक सच्चा कार्यकर्ता वैजनाथ दहातोंडेचे काही तासांपूर्वीच दुःखद निधन झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
वैजनाथ हा एक तरुण आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा माझा चांगला मित्र होता. पक्ष कोणताही असला तरी शहरातील सामाजिक चळवळ जिवंत राहण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचे मोठे योगदान असते. वैजनाथ आणि त्याचे कुटुंबीय दुःखात असताना मला सभा घेणे योग्य वाटत नाही, म्हणून आपण सर्वजण वैजनाथला श्रद्धांजली वाहूया असे सांगितले. यावेळी श्रद्धांजली वाहिल्यानंतर सभा संपल्याचे जाहीर करत सर्वजण आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी निघून गेले. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या या संवेदनशीलतेची परळीकरांमध्ये चांगलीच चर्चा होती.
यावेळी सोमनाथ अप्पा हालगे,बाजीराव धर्माधिकारी,वाल्मीक अण्णा कराड, जाबेर खान पठाण, दिपकराव देशमुख, प्रा.डॉ.विनोद जगतकर, सूर्यभान मुंडे, शरद मुंडे, माणिकभाऊ फड, संजय आघाव, डॉ.सुरेश चौधरी,वैजनाथ बागवाले,सोपान ताटे, अनिल अष्टेकर, गोपाळ आंधळे,नितीन रोडे, गोविंद कुकर, जयप्रकाश लड्डा, जयराज देशमुख, आर.आर.देशपांडे प्रभाकरराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, चेतन सौन्दळे,सुरेश टाक, बाशीत भाई,प्रताप देशमुख, नारायनदेव गोपणपाळे,रमेश मस्के,अर्चना रोडे,पल्लवी भोयटे, अन्नपूर्णा जाधव, उमाताई धुमाळ, गोदावरीताई पोखरकर, भारत ताटे, रतन आदोडे, विठ्ठल अदोडे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.