ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी समाज कल्याण आयुक्त थेट बांधावर

By शिरीष शिंदे | Published: November 9, 2022 02:17 PM2022-11-09T14:17:20+5:302022-11-09T14:17:56+5:30

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या कामकाजाला वेग 

Social Welfare Commissioner directly at the farmland to know the issues of sugarcane workers | ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी समाज कल्याण आयुक्त थेट बांधावर

ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी समाज कल्याण आयुक्त थेट बांधावर

googlenewsNext

बीड: ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी माजलगाव महेश साखर कारखाना व बीड परिसरात थेट बांधावर जाऊन ऊसतोड कामगारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली असून पुण्यामध्ये महामंडळाचे मुख्यालय कार्यान्वित झाले आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना तयार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी शासनाने व्यापक मोहीम राबवून ओळख प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे. ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. नारनवरे यांनी मंगळवारी माजलगाव महेश साखर कारखाना व बीड परिसरात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड कामगारांची चर्चा करत त्यांचे प्रश्न जाणून घेतले.

यावेळी त्यांच्या सोबत पुणे समाज कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, औरंगाबाद विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, बीड समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रविंद्र शिंदे, ऊसतोड कामगारांचे पदाधिकारी, ऊसतोड कामगार व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यासह कर्मचारी व अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी समाज कल्याण विभागाच्यावतीने राज्यात नुकतेच शासकीय वसतिगृह देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत नगर जिल्ह्यातील कर्जत, जामखेड व बीड या ठिकाणी प्रत्यक्ष वसतिगृह सुरू झाली आहेत.

Web Title: Social Welfare Commissioner directly at the farmland to know the issues of sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.