काळोख्या अंधारात पुराच्या पाण्यात १२ तास अडकले; आजोबा-नातवाचा थरारक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 06:22 PM2021-09-08T18:22:58+5:302021-09-08T19:09:54+5:30
Rain in Beed : पाण्याचा वेढा पडल्याने पडताच आजोबा व नातु बाभळीच्या झाडावर चढले.
- पुरूषोत्तम करवा
माजलगाव ( बीड ) : माजलगाव धरणातुन ( Majalgaon Dam ) मोठ्या प्रमाणावर सिंदफना नदीपात्रात ( Sindhfana River ) पाणी सोडण्यात आले. पाण्याचा वेढा पडल्याने शेतातील गोठ्यात निवांतपणे बसलेल्या आजोबा व नातवास 12 तास झाडावर काढण्याची वेळ आली. तर त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या जवानांची बोट उलटली. सुदैवाने त्यातील एकाने झाडाला तर खाली लांब जावुन झाडाला लटकल्याने त्यांचे प्राण वाचले. ( The soldiers who came to the rescue were carried away; Grandfather and grandson rescued from the flood after 12 hours)
माजलगाव धरणाच्या पायथ्याशी देवखेडा येथील शेतकरी रामप्रसाद गोविंद कदम आणि त्यांचा सात वर्षाचा नातू शिवप्रसाद सचिन कदम हे आपल्या गोठ्यावर थांबलेले होते . मंगळवारी दिवसभर धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची मोठी आवक झाली. त्यामुळे धरणातुन सिंदफना नदीपात्रात 1 लाख 32 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोठ्याला पाण्याचा वेढा पडला. मंगळवारी दुपारी तीन वाजता पाण्याचा वेढा पडल्याने आजोबा व नातु बाभळीच्या झाडावर चढले. ही माहिती रामप्रसाद कदम यांनी आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर ही माहिती प्रशासनाला मिळतात तहसीलदार वैशाली पाटील व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे ते घटनास्थळी तळ ठोकून होते. सुरुवातीस काही मच्छीमार व भोई लोकांनी त्यांना काढण्याचा प्रयत्न केला असता पाणी जास्त असल्याने तेही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते.
हेही वाचा - पुरात वाहून गेलेल्या माजी आमदाराच्या मुलाचा आणि नातवाचा मृतदेह सापडला
यानंतर तहसीलदार वैशाली पाटील यांनी परळी व बीड येथील एनडीआरएफ च्या जवानांना पाचारण केले. ते रात्री 10 वाजता पाण्यात उतरले. मात्र, आजोबा नातवापर्यंत पोहोचले असता त्यांची बोट उलटली. या बोटीत दोघे जण होते. यातील एकाने त्याच बाभळीला तर दुसऱ्याने गोशाळेजवळील एका झाडाचा आसरा घेत स्वतःचे प्राण वाचवले. वेगवान प्रवाहामुळे बचाव पथकाची बोट अडकलेल्यापर्यंत पोहचत नव्हती. यातच रात्रीचा अंधार, बाभुळीची झुडुपे त्यामुळेही मदत करताना अडचणी निर्माण होत होत्या. पहाटे तीनपर्यंत पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर स्थानिक भोई पानबुडे यांनी आजोबा-नातू व बचाव पथकातील कर्मचाऱ्याला सुखरूप बाहेर काढले.
हेही वाचा -
- पावसाचे थैमान ! पुरात एकजण वाहून गेला; तर ९०० कोंबड्या दगावल्या
- एकाच कुटुंबातील तिघींना सर्पदंश; दोन चिमुकल्या दगावल्या,आईची मृत्यूशी झुंज