घनकचरा प्रकल्पातील रस्ते टापटीप, पुन्हा ७३ लाख खर्चाचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:03 AM2021-03-04T05:03:17+5:302021-03-04T05:03:17+5:30
मागील काही वर्षांपूर्वी शहरातील घनकचरा साठविण्यासाठी केसापुरी शिवारात नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनाची जागा तयार केली होती. त्यावेळी या ठिकाणी सिमेंट ...
मागील काही वर्षांपूर्वी शहरातील घनकचरा साठविण्यासाठी केसापुरी शिवारात नगरपरिषदेने घनकचरा व्यवस्थापनाची जागा तयार केली होती. त्यावेळी या ठिकाणी सिमेंट रस्ते बनविण्यात आले होते. परंतु या ठिकाणी कचरा टाकण्यात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सतत टाळाटाळ केल्याने रस्ते आजघडीला चांगल्या अवस्थेत आहेत. असे असतानाही पालिकेने या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचे युनिट तयार करायचे कारण पुढे करत ७३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करून मान्यता दिली आहे. यात रस्ते, कचरा जमा करण्यासाठी गच्ची केलेली चबुतरा, शौचालय आदींचा समावेश आहे. वास्तविक पाहता शहरात असलेल्या शौचालयाची निगा पालिकेला राखता आली नाही. तरीही या ठिकाणी शौचालय बांधण्यामागचा हेतू समजण्यापलीकडचा आहे. तर शहरात बऱ्याच गल्ली-बोळात रस्त्याची दुरवस्था आहे. या ठिकाणी रस्ते करण्यास प्राधान्य देण्याऐवजी पालिका अशा ठिकाणी लाखो रुपये खर्चून रस्ते करण्याचा फार्स करत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी दोन वर्षांपूर्वी जुन्या माजलगावात ६ लाख रुपये खर्चून रस्ता बांधण्यात आला होता. ज्याचा काहीही उपयोग झाला नाही. असाच प्रकार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या ठिकाणी घडत आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर होणारे संभाव्य रस्ते पाहून पालिकेच्या कारभारावर संशय निर्माण होत आहे. मलिदा लाटण्याच्या उद्देशाने चाललेल्या कारभारावर आळा घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीे ही कामे रद्द करून हा निधी शहराकडे वळवावा, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणचे रस्ते व इतर कामांसाठी ७३ लाख रुपयांचे टेंडर झाले असून, याच ठिकाणी विविध कामांसाठी सव्वातीन कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
- के. एस. जोगदंड, स्थापत्य अभियंता, माजलगाव नगरपालिका
===Photopath===
030321\purusttam karva_img-20210303-wa0015_14.jpg