रिक्षा चालक-मालकांच्या सर्व समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:34+5:302021-02-26T04:47:34+5:30
बीड शहरातील अंबिका चौक येथे राजमुद्रा सामाजिक संघटना संलग्नित ऑटो पाॅईंटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजमुद्रा वाहतूक शाखेचे ...
बीड शहरातील अंबिका चौक येथे राजमुद्रा सामाजिक संघटना संलग्नित ऑटो पाॅईंटच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राजमुद्रा वाहतूक शाखेचे मराठवाडा प्रमुख महेश शिंदे, जिल्हाध्यक्ष सुशांत लोखंडे, शिव मल्हार संघटनेचे अध्यक्ष संदीप बुधनर, शेख रईस, आकाश पिंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दत्ता राऊत, गणेश टाटोर, अमेर शेख, साजेद शेख, शेख युसूफ, संतोष उगले, आसाराम शेंडगे, पप्पू तागड, बंडू घोगे, गोपाळ, सुदाम शिंदे, पिंटू तागड, भुजंग तागड, सुभाष दराडे, सुनील इंगोले, भाऊसाहेब जानोळे यांच्यासह इतर उपस्थित होते.
चालकांना विमा काढून देणार
वाहन चालकाचा अपघात झाला तर त्याला हॉस्पिटलचा खर्च पेलावत नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीन जिल्ह्यातील अधिकाधिक वाहन चालकांना अपघात विमा व बॅच काढून दिला जाणार असल्याचे राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा नगर सेवक किशोर पिंगळे यांनी सांगितले आहे.
बीड शहरातील अंबिका चौक येथे ऑटो पाॅईंटचे उद्घाटन राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक किशोर पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतर वाहनचालकांची उपस्थिती होती.
===Photopath===
250221\25bed_18_25022021_14.jpg
===Caption===
बीड शहरातील अंबिका चौक येथे ऑटो पाँईटचे उद्धघाटन राजमुद्रा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक किशोर पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतर वाहन चालकांची उपस्थिती होती.