शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:43+5:302021-05-19T04:34:43+5:30

लॉकडाऊनमुळे स्थलांतर थांबले बीड : तालुक्यातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे व विविध महानगरात रोजगारासाठी असतात; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

Solve the problems of the farmers | शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा

शेतकऱ्यांच्या समस्या सोडवा

Next

लॉकडाऊनमुळे स्थलांतर थांबले

बीड : तालुक्यातील बहुतांश लोक उदरनिर्वाहासाठी मुंबई, पुणे व विविध महानगरात रोजगारासाठी असतात; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसाय बंद आहेत.गावातही हाताला काम नाही.सर्व बंद असल्याने महानगराकडेही जाता येईना.यामुळे अनेकांचे स्थलांतर थांबले आहे.

घंटागाडी येईना, नागरिकांची गैरसोय

अंबाजोगाई : शहरातील भटगल्ली, जैनगल्ली परिसरात येणारी घंटागाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा पडून राहत आहे. गाडी नियमित व वेळेवर आल्यास योग्यरित्या कचऱ्याची विल्हेवाट लागेल व स्वछता राहील.यासाठी घंटागाडी नियमित वेळेवर आली पाहिजे,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांडे यांनी केली आहे.

‘ओव्हरलोड’ वाहतूक; लहान रस्त्यांची दैना

अंबाजोगाई : शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डम्परमुळे रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Solve the problems of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.