बेटा ! घर कब आओगेऽऽऽ ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:39 PM2019-05-03T23:39:43+5:302019-05-03T23:43:14+5:30

शहरातील क्रांतीनगरमधील राहत्या घरून शहीद तौसिफ शेख यांचे पार्थिव उचलले आणि आक्रोशातून चार शब्द पुढे आले. ‘बेटा! घर कब आओगे..’ हे शब्द तौसिफ यांच्या आई शेख शमीम यांचे होते.

Son! When will you come home | बेटा ! घर कब आओगेऽऽऽ ?

बेटा ! घर कब आओगेऽऽऽ ?

Next
ठळक मुद्देअखेरचा अलविदा : आई शेख शमीम यांची मुलगा तौसिफ यांच्या पार्थिवाकडे पाहून भावनिक हाक

सोमनाथ खताळ / विलास भोसले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा : शहरातील क्रांतीनगरमधील राहत्या घरून शहीद तौसिफ शेख यांचे पार्थिव उचलले आणि आक्रोशातून चार शब्द पुढे आले. ‘बेटा! घर कब आओगे..’ हे शब्द तौसिफ यांच्या आई शेख शमीम यांचे होते. मुलाला अखेरचा निरोप देताना आई शमीम यांच्यासह संपूर्ण जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांचे डोळे पाणावले. अखेर जड अंत:करणाने आईने आपल्या मुलाला अखेरचा ‘अलविदा’ केला.


अवघ्या आठवडाभरावर आलेल्या रमजानसाठी तौसिफ घरी येणार होते. त्यासंदर्भात आई शेख शमिम आणि वडिल शेख आरेफ यांच्याशी संवादही झाला होता. हाच संवाद अखेरचा राहिला. त्यानंतर तौसिफ यांच्या निधनाचीच वार्ता आली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पार्थिव राहत्या घरी आणण्यात आले. यावेळी आई शमीम यांनी टाहो फोडला. त्यांना सावरताना नातेवाईकही गहिवरून गेले. चार तास पार्थिव अंतीमदर्शनासाठी घरासमोर ठेवले होते. पार्थिव उचलेपर्यंत त्या एकाच ठिकाणी बसून होत्या.
अखेर ९ वाजता पार्थिव उचलण्याची वेळ आली. सर्वांनी त्यांना बाजूला काढले. मात्र, त्या पार्थिवापासून दुर होत नव्हत्या. तौसिफ यांची पत्नी अंजूम या सुद्धा तेथे सोबतच होत्या. वडिल आरेफ यांना काही नागरिकांनी बाजूला सावलीत बसवून आधार दिला तर लहान मुलांनीही टाहो फोडला.
दरम्यान, पार्थिव उचलण्यासाठी पोलीस जवानांसह मुस्लीम बांधव पुढे सरसावले आणि उपस्थितांनी ‘अमर रहे, अमर रहे, तौसिफ भैय्या अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे वातावरण आणखीच भावनीक झाले. पार्थिव उचलून लोक पुढे निघताच आईन आक्रोश केला. ‘तौसिफ बेटा, घर कब आओगे..’ अशी भावनिक हाक देताच उपस्थितही हेलावले. अखेर नातेवाईकांना त्यांना दूर करीत त्यांच्यापासून तौसिफ यांचे पार्थिव उचलून मार्गस्थ केले. जोपर्यंत पार्थिव दिसत होते, तोपर्यंत आई शमीम या आपल्या मुलाला परत येण्यासाठी हाक देत होत्या.
एसपी, एएसपींचा ‘सॅल्यूट’ : मान्यवरांकडून अभिवादन
४दफनविधीस्थळी पार्थिव पोहचताच उपस्थित मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पन करून अभिवादन केले. यावेळी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे, उपअधीक्षक विजय लगारे, निवृत्त कर्नल डोर्ले, कॅप्टन माळी यांनी तौसिफ यांना सॅल्यूट ठोकला. तर उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार रुपा चित्रक यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पन करून अभिवादन केले.

नमाज-ए-जनाजा अदा केली
४पार्थिव दफनस्थळी आल्यावर मौलाना मुफ्ति मोईन साहब, गेवराई यांनी नमाज-ए-जनाजा अदा केली.
४त्यानंतर त्यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, शेवटच्या क्षणापर्यंत आपण देशसेवा केली पाहिेजे.
४पे्रषित मोहम्मद पैगंबर यांनी देखील आपल्याला देशसेवा करण्यासाठी प्रेरणा दिलेली आहे.
४यावेळी मौलाना जाकीर सिद्दीकी यांच्यासह इतर मौलानांचीही उपस्थिती होती.

Web Title: Son! When will you come home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.