सवलतीची वेळ संपताच मुख्याधिकारी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:34 AM2021-04-20T04:34:44+5:302021-04-20T04:34:44+5:30
गेवराई : लॉकडाऊन कालावधीत सवलतीचा वेळ संपूनही उघडी दुकाने बंद करण्यासाठी येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पोलिसांनी रस्त्यावर उतरले, ...
गेवराई : लॉकडाऊन कालावधीत सवलतीचा वेळ संपूनही उघडी दुकाने बंद करण्यासाठी येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व पोलिसांनी रस्त्यावर उतरले, तर सवलतीचा वेळ होऊनही, तसेच प्रतिबंध असताना शहरातील चार कापड दुकाने सुरू होती. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात आला.
बीड जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्ह्यात व तालुक्यात सोमवारपासून किराणा, बेकरी, फळविक्रेत्यांसह अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. असे आदेश असतानाही सोमवारी शहरातील काही व्यापारी बांधवांनी आपली दुकाने चालू ठेवली होती. वेळ संपूनही दुकाने चालू असल्याचे पाहून येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी स्वत: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कोल्हेर रोड, नवीन बस स्थानक, जुने बस स्थानक, शास्त्री चौक, सराफ लाइनसह विविध भागांत फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानंतरही शहरातील चार कापड दुकाने चालू असल्याचे दिसून आले. या चारही कापड दुकानदारांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी उमेश ढाकणे, भागवत येवले, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळसह नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.
===Photopath===
190421\20210419_113722_14.jpg