अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:36 AM2021-08-19T04:36:45+5:302021-08-19T04:36:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुळे लॉकडाऊन केले होते. परंतु आता निर्बंध शिथिल केल्यानंतर अपघात विभागातील गर्दी वाढल्याचे चित्र ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे लॉकडाऊन केले होते. परंतु आता निर्बंध शिथिल केल्यानंतर अपघात विभागातील गर्दी वाढल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यातच जागा स्थलांतरित असल्याने स्वच्छता, सोयी, सुविधांबद्दल तक्रारी कायम आहेत. यात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
मागील दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. हा आजार संसर्गजन्य असल्याने देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. परंतु चालू वर्षात आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात निर्बंध घालून लॉकडाऊन उघडण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी वाढली. अपघातांसह इतर वादांचे प्रमाणही वाढले. याच अनुषंगाने स्थलांतरित जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागातील आकडेवारी घेतली असता रुग्णसंख्याही वाढल्याचे समोर आले आहे. येथे आल्यानंतर उपचार मिळत असले तरी सोयी सुविधांसह स्वच्छतेबद्दल कायम तक्रारी प्राप्त होत आहेत. यात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
...
अपघातास दारूही कारणीभूत
जास्त अपघात हे मद्यपान करून केल्याने होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच काही अपघातांमध्ये वाहनचालक अल्पवयीन असतात. अपघातास दारू हे सुद्धा हे एक कारण आहे. पोलीस, प्रशासन यांच्याकडून वारंवार वाहतूक नियम पाळण्यासह मद्यपान करून वाहने चालवू नये, असे आवाहन केले जात आहे. परंतु लोक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघात होत असल्याचे सांगण्यात आले.
^^^....
अपघाताची आकडेवारी
जून २०१९ जून २०२० जून २०२१
अपघात ८१ ५० ६०
जखमी ८१ ५० ५८
मृत्यू ०० ०० ०२