उन्हाळा सुरू होताच महिलांची वाळवण करण्याची लगबग सुरू - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:22+5:302021-03-25T04:31:22+5:30

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव गेले काही महिने कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ...

As soon as summer starts, women start drying up - A | उन्हाळा सुरू होताच महिलांची वाळवण करण्याची लगबग सुरू - A

उन्हाळा सुरू होताच महिलांची वाळवण करण्याची लगबग सुरू - A

Next

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव गेले काही महिने कमी झाला होता. मात्र, आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने काही नागरिक व महिला घरीच बसून असतात. यात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच महिलांची वाळवण करण्याची लगबग जोरात सुरू आहे. आज ग्रामीण भागाबरोबर शहरातील महिला वाळवण करण्यात मग्न आहेत. शाळा बंद असल्याने या वाळवणाच्या कामात मुले व मुली मदत करीत असल्याचे चित्र दिसत आहे. या वाळवणाच्या कामात बटाटा चिप्स, बाजरी, ज्वारी पापड्या तसेच कुरडाई, पापड, शेवयांसह विविध प्रकारचे वाळवण करण्याची लगबग जोरात सुरू आहे. हे वाळवणाचे काम करताना शहरातील शकुंतला शिंदे, अंजली शिंदे, स्वाती शिंदे, सारिका शिंदे, प्रियंका पवार यांसह शहरातील व ग्रामीण भागातील महिलांशी चर्चा केली.

घरातील इतर जण या कामात मदत करीत असल्याने वेळ जातो व घराबाहेर कुणीही जात नसल्याचे चित्र ग्रामीण भागाबरोबर शहरात दिसत आहे. आता वाळवणाची कामे सुरू झाल्याने मुले, मुली वाळवणाच्या कामात मदत करीत असल्याने ते घरा बाहेर जात नसल्याचे शारदा पवार यांनी सांगितले.

===Photopath===

230321\591120210320_105752_14.jpg

===Caption===

उन्हाळा सुरू होताच महिलांची वाळवण करण्याची लगबग सुरू आहे. गेवराई शहरातील एक दृष्य.

Web Title: As soon as summer starts, women start drying up - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.