दोन महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेल्या एक्स-रे टेक्निशियनची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 06:38 PM2021-12-21T18:38:39+5:302021-12-21T18:41:22+5:30

ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरु आहे

'Sorry Mommy-Daddy'; X-ray technician of sub-district hospital Parali commits suicide by writing suicide note | दोन महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेल्या एक्स-रे टेक्निशियनची आत्महत्या

दोन महिन्यांपूर्वीच उपजिल्हा रुग्णालयात रुजू झालेल्या एक्स-रे टेक्निशियनची आत्महत्या

googlenewsNext

परळी ( बीड ) : येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक्स-रे टेक्निशियनने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. सिद्धार्थ पंडितराव जाधव ( 33) असे मृताचे नाव असून एक सुसाईड नोट आढळून आली आहे. सिद्धार्थ जाधव हा हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे. 

दोन महिन्यापूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात सिद्धार्थ जाधव हे नोकरीस रुजू झाले होते. मंगळवारी सकाळी नऊ वाजता ड्युटीला न आल्याने त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी फोन केला असता फोन उचलला गेला नाही. नंतर त्यांच्या घरात जाऊन पाहणी केली असता गह्रातील पंख्यास गळफास घेतलेल्या अवस्थेत सिद्धार्थ आढळून आले. 

या घटनेची खबर संभाजीनगर पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली .येथील उपजिल्हा रुग्णालय कर्मचारी वसाहतीत सिद्धार्थ जाधव राहत होते .परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, ठाकूर, मंठाळे,विलास देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. दरम्यान, सिद्धार्थ जाधव यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यात 'मम्मी-डॅडी मला माफ करा' असा मजकूर असल्याची माहिती आहे. ही सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: 'Sorry Mommy-Daddy'; X-ray technician of sub-district hospital Parali commits suicide by writing suicide note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.