पाटोदा तहसीलसमोर सोयाबीनचे खळे करीत दाखविला उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 11:52 PM2018-10-04T23:52:54+5:302018-10-04T23:53:27+5:30
तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची सर्वच पिके वाया गेली आहेत. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य आणी सत्य माहिती शासनास कळविण्यात यावी यासाठी गुरुवारी चक्क तहसील कार्यालयासमोर ‘खळ्यावर या’ असे अभिनव आंदोलन करण्यात आले. प्रांगणात सोयाबीनचे पिक बडवण्यात आले. खळे करुन तहसीलदारांना प्रत्यक्ष उतारा दाखवण्यात आला .
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटोदा: तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीपाची सर्वच पिके वाया गेली आहेत. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी प्रशासनाकडून योग्य आणी सत्य माहिती शासनास कळविण्यात यावी यासाठी गुरुवारी चक्क तहसील कार्यालयासमोर ‘खळ्यावर या’ असे अभिनव आंदोलन करण्यात आले. प्रांगणात सोयाबीनचे पिक बडवण्यात आले. खळे करुन तहसीलदारांना प्रत्यक्ष उतारा दाखवण्यात आला .
यंदाच्या पावसाळ्यात केवळ २७ टक्के पाऊस झाल्याचा आंदोलकांचा दावा आहे. सुरु वातीस चांगला पाऊस झाल्याने खरीपाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला. मात्र, पावसाने दडी मारल्याने सर्वच पिके वाया गेली. तहसील आणि कृषी प्रशासनाकडून मागील काही वर्षात चुकीची माहिती शासनास कळविल्याने तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. विमाही मिळाला नाही. यंदाही भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. पुन्हा चुकीची माहिती देऊन शेतकºयांवर अन्याय होऊ नये म्हणून थेट तहसीलच्या प्रांगणातच सोयाबीनचे खळे करण्यात आले.
सुकाणू समितीचे सदस्य राजाभाऊ देशमुख, कॉ. महादेव नागरगोजे, विष्णुपंत घोलप, चक्रपाणी जाधव, गणेश कवडे, कॉ. नागरे, अण्णासाहेब राऊत, राजेंद्र खाडे, राम गोंदकर, राहुल बामदळे, अमोल गोरे, महिला शेतकरी या आंदोलनात सहभागी होते. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून सोयाबीन पिकांची बैलगाडी मोर्चामध्ये होती. मोदी-फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.