सोयाबीन पिकाचे होत्याचे नव्हते झाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:32 AM2021-09-13T04:32:19+5:302021-09-13T04:32:19+5:30
शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा : संजय दौंड यांच्याकडून पाहणी लोकमत न्यूज नेटवर्क परळी : मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने काढणीला आलेले ...
शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा : संजय दौंड यांच्याकडून पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : मागील आठवड्यात पडलेल्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन पीक वाहून गेले. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. जवळपास ५० हेक्टरवरील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक नष्ट झाले, अशा व्यथा शेतकऱ्यांनी मांडल्या.
महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य आमदार संजय दौंड यांनी शनिवारी पट्टीवडगाव, पिंपरी, चोपणवाडी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. तसेच कृषी सहायक, तलाठ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शासनस्तरावरून होईल तेवढी मदत देण्याचे आश्वासन आमदार दौंड यांनी शेतकऱ्यांना दिले.
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माझ्यावर अंबाजोगाई तालुक्याची जबाबदारी सोपवली आहे, असे आमदार संजय दौंड यांनी सांगितले. या भागात सिंगल फेज लाईट, शेतकऱ्यांना ६३ ट्रान्सफाॅर्मर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी या भागातील शेतकरी बळीराम पितळे, जिजाराम लव्हारे, बालासाहेब डोंगरे, बालासाहेब लव्हारे, विष्णू वाकडे, खंडेराव मडके, अण्णा कांबळे, रमाकांत लव्हारे, ॲड. केशव लव्हारे, सोमनाथ लव्हारे, शिवाजी महाराज फड, मुंजाबाबा वाकडे, सुरेश लव्हारे, महादेव लव्हारे, संतोष शिंगे, सय्यद अमीर, प्रवीण पितळे उपस्थित होते.