चौदा गावांत सोयाबीन उगवण चाचणी प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:34 AM2021-05-27T04:34:38+5:302021-05-27T04:34:38+5:30
शिरूर कासार : घरचे सोयाबीन बियाणे वापरून शेतकऱ्यांची खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी शिरूर ...
शिरूर कासार : घरचे सोयाबीन बियाणे वापरून शेतकऱ्यांची खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने मंगळवारी शिरूर तालुक्यातील १४ गावांत बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे यांनी जिल्हा कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात घुगेवाडीसह चौदा गावांत मंगळवारी हे प्रात्यक्षिक घेण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर घुगेवाडी येथे बियाणे उगवण चाचणी घेण्यात आली, अगोदर थायरमची व नंतर १० टक्के खत बचतीच्या दृष्टीने रायझोबायमची बीजप्रक्रिया करून माहिती देण्यात आली.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, सहप्रभारी तालुका कृषी अधिकारी कैलास राजबिंडे, एस. एस. जाधव, अर्जुन चव्हाण, रवि पवार, जालिंदर सानप व शेतकरी उपस्थित होते. लोणी, वार्णी, जांब, खांबा, लिंबा, नारायणवाडी, तिंतरवणी, गोमळवाडा, जाटनांदूर, मानूर, आर्वी, पाडळी, ढोकवड या चौदा गावांत बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला.
...
===Photopath===
260521\vijaykumar gadekar_img-20210526-wa0016_14.jpg
===Caption===
शिरुर तालुक्यातील घुगेवाडी येथे घरच्या सोयाबीन बियाणांची बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक दाखविताना कृषी अधिकारी. समवेत शेतकरी.