१२ मंडळांतील शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:34 AM2019-07-17T00:34:26+5:302019-07-17T00:36:56+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा होती. मंगळवारी १२ महसूल मंडळातील जवळपास ४७ हजार शेतकºयांना सोयाबीनचा विमा जाहीर झाला आहे.

Soybean Insurance for 12 Circle Fellows | १२ मंडळांतील शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा

१२ मंडळांतील शेतकऱ्यांना सोयाबीनचा विमा

googlenewsNext

बीड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा होती. मंगळवारी १२ महसूल मंडळातील जवळपास ४७ हजार शेतकºयांना सोयाबीनचा विमा जाहीर झाला आहे. याची रक्कम दोन दिवसांत शेतक-यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
बीड जिल्ह्यातील ४ लाख ७६ हजार ५६८ शेतक-यांनी सोयाबीनचा विमा भरला होता. यापुर्वीच पहिल्या टप्प्यात २२ मंडळातील जवळपास १ लाख ३१ हजार ६२८ शेतक-यांना २४६ कोटी ३४ लाख ६३ हजार रूपयांचा विमा वाटप झालेला आहे. त्यानंतर आणखी ४१ मंडळातील शेतक-यांना सोयाबीन विम्याची प्रतीक्षा होती. मंगळवारी आणखी कवडगाव, वडवणी, म्हाळस जवळा, नाळवंडी, पेंडगाव, पिंपळनेर, राजुरी, दिंद्रुड, नित्रूड, धारूर, मोहखेड आणि तेलगाव या १२ मंडळातील जवळपास ४७ हजार शेतक-यांना विमा जाहीर झाला आहे.
यामध्ये मोहखेड मंडळातील शेतकºयांना पैसे जमा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. राहिलेल्या मंडळातील शेतकºयांच्या खात्यावर दोन दिवसांत पैसे जमा होतील, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
शेतक-यांना कित्येक महिन्यांपासून सोयाबीनच्या पीक विम्याच्या प्रतीक्षेत होते. ४७ हजार शेतकºयांना दोन दिवसांत विमा शेतकºयांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Soybean Insurance for 12 Circle Fellows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.