सोयाबीनच्या दरात तेजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:38+5:302021-04-10T04:32:38+5:30
अंबाजोगाई : गेल्या तीन दिवसांपासून अंबाजोगाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होत आहे. यावर्षीच्या हंगामात सोयाबीनचे ...
अंबाजोगाई : गेल्या तीन दिवसांपासून अंबाजोगाईच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात मोठी वाढ होत आहे. यावर्षीच्या हंगामात सोयाबीनचे दर ३,५०० ते ५,५०० पर्यंत पोहोचले. तर गेल्या तीन दिवसात हे दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
सोयाबीन सांभाळून ठेवलेल्या शेतकऱ्यांना चांगल्या दराची संधी चालून आली आहे.
नाभिक समाजाला न्याय द्या
अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या लॉकडाऊनसदृश स्थिती आहे. त्यामुळे नाभिक समाजाची सलून बंद ठेवण्यात आली आहेत. सलग दुकाने बंद राहिल्याने या दुकानदारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. शासनाने यासंदर्भात गांभिर्याने विचार करावा, अशी मागणी नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते विठ्ठलराव गवळी यांनी केली आहे.
ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांना धास्ती
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. आता जर पाऊस झाला तर पुन्हा राहिलेल्या आंब्याचे नुकसान होते की काय?अशी धास्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
नवीन कोरोना नियम; व्यापाऱ्यांमध्ये नाराजी
अंबाजोगाई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांत सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत; मात्र याबाबत नागरिक व व्यापारी यांच्यात अजूनही संभ्रम निर्माण झालेला आहे. काही व्यापार सुरू असले तरी त्यासाठीचे पूरक व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेकांची कोंडी झाली आहे.
आवक घटल्याने फळे महागली
अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात सध्या लॉकडाऊनसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी फळांची आवक घटली आहे, त्यामुळे सफरचंद, शहाळे, द्राक्ष, मोसंबी व इतर फळे महाग झाली आहेत. याचा फटका ग्राहकांना बसु लागला आहे.
बांधकाम साहित्याने वाहतुकीस अडथळा
अंबाजोगाई : शहरातील अनेक मुख्य रस्ते व वसाहतीमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्य पडलेले आहे. याचा मोठा त्रास वाहतुकीस होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रसासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.