सोयबीन,तूर पीक विमा; स्वाभिमानीचे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 11:44 PM2019-06-28T23:44:14+5:302019-06-28T23:44:48+5:30

शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर पिकांचा खरीप हंगामातील पीक विमा ओरियन्टल इन्शूअरन्स कंपनीने जाणीवपूर्वक वगळल्याने शेतक-यांनी संतप्त होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बीड-परळी महामार्गावर घाटसावळी येथे आज शुक्रवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

Soybean, tur crop insurance; Stop the way of self respecting | सोयबीन,तूर पीक विमा; स्वाभिमानीचे रास्ता रोको

सोयबीन,तूर पीक विमा; स्वाभिमानीचे रास्ता रोको

googlenewsNext

बीड : तालुक्यातील पिंपळनेर, म्हाळसजवळा, घाटसावळी, महसूल मंडळात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर पिकांचा खरीप हंगामातील पीक विमा ओरियन्टल इन्शूअरन्स कंपनीने जाणीवपूर्वक वगळल्याने शेतक-यांनी संतप्त होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बीड-परळी महामार्गावर घाटसावळी येथे आज शुक्रवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी कंपनीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत, येत्या ८ दिवसात सर्व जिल्ह्यातील शेतक-यांना तात्काळ विमा द्यावा, अन्यथा विमा कंपनीच्या कार्यालात आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलपदिप करपे, लहू गायकवाड पाटील , राजेंद्र डाके पाटील, अतुल झाटे, उद्धव साबळे, धनंजय रोकडे, रामनाथ महाडिक, कमलाकर लांडे, तानाजी वीर, सुरेश घुमरे, कानिफ वीर यांच्याह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Soybean, tur crop insurance; Stop the way of self respecting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.