बोंडअळी निर्मूलनासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 12:30 AM2018-12-28T00:30:32+5:302018-12-28T00:31:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात मगाील दोन वर्षांपासून कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात ...

A special campaign for the eradication of bottlenecks | बोंडअळी निर्मूलनासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम

बोंडअळी निर्मूलनासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम

Next
ठळक मुद्देबांधावर जाऊन शेतकऱ्यांना सल्ला : बोंडअळी प्रादुर्भाव रोखण्यासाठी प-हाटीसह पालापाचोळा जाळून टाकण्यासाठी आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात मगाील दोन वर्षांपासून कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होत असून, शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या अळीचे समूळ नष्ट करण्याची आवश्यकता असून, कृषी विभागाच्या माध्यमातून बोंडअळी निर्मूलन मोहीम राबवली जात आहे. कपसाच्या पºहाट्यामध्ये बोंडअळी कीड सुप्त अवस्थेत राहत असून, गंजी करुन बांधावर न ठेवता जाळून टाकण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
बोंडअळी प्रादुर्भावामुळे कापूस पिकावर मोठा परिणाम झाला असून, उत्पादन देखील घटले आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभागातर्फे विशेष मोहिम राबवली जात असून शेतक-यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जात आहे.
मंगळवारी तालुक्यातील कांबी, कामखेडा पेंडगाव येथे शेतात जाऊन शेतकºयांना प्रत्याक्षिक दाखवण्यात आले. शेतात गोळा करुन ठेवलेली पºहाटी जाळून नष्ट करण्यात आली तसेच सर्वांनी याच पद्धतीने पºहाटी नष्ट करण्याचा सल्ला देखील कृषी विभागाच्या वतीने देण्यात आला. यावेळी कृषी संचालक रमेश धुमाळ, कृषी अधिक्षक एम. एल. चपळे, आत्माचे बी. एम. गायकवाड, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, वनगुजरे, लक्ष्मीकांत कागदे, यांच्यासह शेतक री उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कापूस लावल्यानंतर काही महिने शेतकºयांनी फवारणी केली. त्यानंतर हे पीक हाताला लागणार नाही म्हणून फवारणी करणे बंद केले. मात्र, कापूस तसाच शेतात उभा होता. त्यामुळे बोंडअळीचे प्रमाण यामध्ये वाढतच गेले. त्यामुळे येत्या हंगामात पाऊस चांगला झाला व कापूस लागवड केली तरी देखील बोंडअळीचा प्रदुर्भाव होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकºयांनी पºहाट्या, पाला, पाचोळा जाळून नष्ट करणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छ झालेल्या शेतात जनावरे, शेळया मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात शेत नांगरताना खोल नागरावे जेणेकरुन अळीचे जीवनचक्र संपुष्ठात येऊन प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल अशी माहिती अधिकारी दिलीप जाधव यांनी दिली.

Web Title: A special campaign for the eradication of bottlenecks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.