दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:24 AM2021-06-05T04:24:34+5:302021-06-05T04:24:34+5:30
राजेंद्र लाड : दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा आष्टी : बीड जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील दिव्यांग बांधवांनी ५ जून रोजी ...
राजेंद्र लाड : दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा
आष्टी : बीड जिल्ह्यातील ४५ वर्षांपुढील दिव्यांग बांधवांनी ५ जून रोजी विशेष लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासन मान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी केले आहे.
या दिवशी फक्त ४५ वर्षांवरील दिव्यांग बांधवांचे लसीकरण सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणार आहे. यासाठी त्यांना कुठल्याही ऑनलाइन नोंदणीची गरज नाही. लसीकरणास जाताना दिव्यांग बांधवांनी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व आधार कार्ड सोबत घेऊन जावे. या दिवशी फक्त दिव्यांग बांधवांचे लसीकरण होणार असल्याने इतर सर्वसामान्य व्यक्तींचे लसीकरण बंद राहणार आहे.
दिव्यांग बांधवांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन दिव्यांग कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष महादेव सरवदे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड, जिल्हासचिव इंद्रजित डांगे, मधुकर अंबाड, नंदकिशोर मोरे, बाळासाहेब सोनसळे, दत्तात्रय गाडेकर, शेषराव सानप, नवनाथ लोंढे, संजीवनी गायकवाड, वैशाली कुलकर्णी आदींनी केले आहे.