जलयुक्तच्या केलेल्या कामांवर पुन्हा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:19 AM2019-03-17T00:19:28+5:302019-03-17T00:20:04+5:30
जलयुक्त शिवार ही योजना कृषी विभागव मागील दोन वर्षापुर्वी पंचायत समिती रोहयोच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे.
बीड : जलयुक्त शिवार ही योजना कृषी विभागव मागील दोन वर्षापुर्वी पंचायत समिती रोहयोच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे. मात्र दोन वर्षापुर्वी मंजुर केलेल्या सर्व योजना रद्द करुन नव्याने कामे करण्याचे आदेश असताना देखील पुन्हा २०१६ मधील कामांचे जलयुक्त शिवर योजना रोहयोच्या माध्यमातून राबवण्याचा घाट पंचायत समितीच्या माध्यमतून घालण्यात येत आहे.
पूर्वी केलेल्या कामांवर पुन्हा खर्च केला जात असल्याच्या तक्रारी काही गावांमधून संबंधित विभागाकडे आल्याची माहिती आहे.
यावर्षी पुन्हा दुष्काळी परिस्थितीमुळे कामे सुरु करण्याचे आदेश येताच भ्रष्टाचारामुळे बंद कलेली कामे सुरु करण्याचा घाट कार्यकर्ते व अधिकाऱ्यांनी घातल्याचे दिसून येत आहे.मात्र ज्या गावांमध्ये इतर विभागांच्या माध्यमातून जलयुक्तची कामे झाली आहेत, त्याच ठिकाणी पुन्हा रोहयोच्या माध्यमातून कामे सुरु करण्याचा घाट घालून पैसे उखळण्याचे प्रकार सुरु असल्याची तक्रार तालुक्यातील बोरदेवी येथील ग्रामस्थांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिली आहे. त्यामुळे ही कामे पुन्हा सुरु केली असतील तर आदेशाचे पालन करण्यात आलेले नाही त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.