अंबाजोगाईत मॅरेथॉन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:35 AM2021-02-11T04:35:42+5:302021-02-11T04:35:42+5:30
या कार्यक्रमात गोल्डन स्पोर्ट क्लबच्या वतीने राष्ट्रीय पदक विजेता रष्मिता शारदाप्रसाद साहू यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार ...
या कार्यक्रमात गोल्डन स्पोर्ट क्लबच्या वतीने राष्ट्रीय पदक विजेता रष्मिता शारदाप्रसाद साहू यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र विभागातून स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंबाजोगाई क्रीडा, सांस्कृतिक, व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यासह इतरांनी पुढाकार घेतला.
स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे : पुरुष मॅरेथॉन स्पर्धा - गोपीनाथ गायकवाड (प्रथम), अशोक फुंदे (द्वितीय), ऋषी सांगळे (तृतीय). बारा वर्षांखालील मुले १०० मीटर धावणे- अवधूत गोरे (प्रथम), विराज शिंदे (द्वितीय), सय्यद रियान (तृतीय). बारा वर्षांखालील मुली १०० मीटर धावणे- सुरभी जाधव (प्रथम), श्रुती फुले (द्वितीय), समीक्षा भापणीकर (तृतीय). १०० मीटर धावणे वयोगट १२ ते १४ वर्षे मुले-आर्यन राठोड (प्रथम), श्रेयस रंधवे (द्वितीय), गौरांग पवळे (तृतीय). मुली १०० मीटर धावणे - किरण मरेवाड (प्रथम), श्रद्धा भोसले (द्वितीय), श्रेया करतार (तृतीय). वयोगट १४ ते १७ वर्षांखालील मुले १०० मीटर धावणे- अरबाज खान फिरोज खान (प्रथम), विकास पवार (द्वितीय), सचिन किनलवाड (तृतीय). मुली - साक्षी थाटकर (प्रथम), रूपाली शिंदे (द्वितीय), निकिता चोले (तृतीय). खुला गट १०० मीटर धावणे मुले - विष्णू केंद्रे (प्रथम), गजानन आडे (द्वितीय), अमर येवले (तृतीय). मुली - वैष्णवी जाधव (प्रथम), वैष्णवी गोपाणपाळे (द्वितीय), पल्लवी राठोड (तृतीय) तसेच गोळाफेक स्पर्धा मुले- सागर राठोड (प्रथम) आदित्य खोसे (द्वितीय), रितेश सोमवंशी (तृतीय). गोळाफेक स्पर्धा मुली - कोमल वंजारी (प्रथम), रश्मिता साहू (द्वितीय), पूजा आंधळे (तृतीय).