धारूरमध्ये रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:36 AM2021-02-20T05:36:41+5:302021-02-20T05:36:41+5:30

धारूर : येथील सकल मराठा समाज सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व विवीध कार्यक्रमांनी ...

Spontaneous response to blood donation camp in Dharur | धारूरमध्ये रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

धारूरमध्ये रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

Next

धारूर : येथील सकल मराठा समाज सामाजिक संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात व विवीध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत हे कार्यक्रम पार पडले. यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मोठ्या संख्येने दात्यांनी रक्तदान केले. यावेळी शिवभक्तांसाठी शिवप्रसादाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या तालुक्यातील आवरगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमोल जगताप व ग्रामसेवक बालासाहेब झांबडे यांचा श्री भगवत गिता ग्रंथ गौरव करण्यात आला. त्यांचे कार्याचे कौतूक करण्यात आले. नगराध्यक्ष डाॕॅ. स्वरूपसिंह हजारी, माजी नगराध्यक्ष अर्जुनराव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिनगारे, सकल मराठा समाजाचे अतुल शिनगारे, रामेश्वर खामकर, अंनता भोसले, ईश्वर खामकर, नितीन शिनगारे, अॕॅड. परमेश्वर शिनगारे, सुरेश फावडे, अॕॅड. मोहन भोसले. नगरसेवक संजित कोमटवार, बाळासाहेब खामकर, विनायक शिनगारे, सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार, शोएब पठान आदी उपस्थित होते.

===Photopath===

190221\img-20210219-wa0144_14.jpg~190221\img-20210219-wa0164_14.jpg

Web Title: Spontaneous response to blood donation camp in Dharur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.