डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग सिझन - ४ ला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:38 AM2021-09-22T04:38:02+5:302021-09-22T04:38:02+5:30
बीड : डिस्कव्हरी प्रस्तुत पॉवर्ड बाय ‘बायजू’स व ‘लोकमत’च्या सहकार्याने आयोजित भारतातील सर्वांत प्रसिद्ध व प्रतिष्ठित नॅशनल लेव्हल आंतरशालेय ...
बीड : डिस्कव्हरी प्रस्तुत पॉवर्ड बाय ‘बायजू’स व ‘लोकमत’च्या सहकार्याने आयोजित भारतातील सर्वांत प्रसिद्ध व प्रतिष्ठित नॅशनल लेव्हल आंतरशालेय ऑनलाईन परीक्षेच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
मागील तीन वर्षांपासून नॅशनल लेव्हलवर प्रश्नमंजूषेचे आयोजन करण्यात येत आहे. यात विविध राज्यांतून विद्यार्थी सहभागी होत असतात. यामुळे चौथ्या पर्वाच्या परीक्षेचेही ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.
तिसरी ते दहावीचे विद्यार्थी घरबसल्या या परीक्षेत सहभागी होऊ शकतात. शालेय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर तीन टप्प्यांत आंतरशालेय प्रश्नमंजूषा घेण्यात येणार आहे.
अशी होईल स्पर्धा
शालेयस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषेमध्ये एकपेक्षा अधिक पर्याय असलेल्या २० प्रश्नांची उत्तरे ३० मिनिटांत पूर्ण करावी लागणार आहेत. शाळेमधून प्रत्येक गटातील एक विद्यार्थी राज्यस्तरीय प्रवेशासाठी पात्र होऊ शकेल.
राज्यस्तरावर एकापेक्षा अधिक पर्याय असलेल्या प्रश्नमंजूषेमधून सर्वोत्कृष्ट दोन विद्यार्थांना राष्ट्रीय स्तरासाठी निवडण्यात येईल.
प्रत्येक राज्यातील विजेत्यांमध्ये होणारी प्रश्नमंजूषा डिस्कव्हरी वाहिनीवर भारतात प्रक्षेपित केली जाणार आहे. मुंबई येथे डिस्कव्हरी वाहिनीच्या स्टुडिओमध्ये ती चित्रित केली जाईल.
प्रतिक्रिया
‘लोकमत’ने आयोजित केलेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही परीक्षा मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे मुलांचा अभ्यास होतो आणि वेळेचा सकारात्मक उपयोग होतो. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
- वैजनाथ तेलंग,
(भेल सेकंडरी स्कूल, परळी)
——————
लोकमत डिस्कव्हरी ऑनलाईन परीक्षा हाही स्तुत्य उपक्रम लोकमत परिवाराने राबविला आहे. स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी सामान्य ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत या परीक्षेच्या माध्यमातून पोहोचत आहे.
- आनंद मरळगोईकर, प्राचार्य, ईगलवूड इं. स्कूल माजलगाव
—————————
‘लोकमत’ने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे. बायजूच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत स्पर्धा करण्यास मिळेल हा लक्षणीय उपक्रम आहे.
- सागर राऊत, प्राचार्य, सिनर्जी इंटरनॅशनल स्कूल अंबाजोगाई