केजमध्ये लोकमत रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:23 AM2021-07-15T04:23:43+5:302021-07-15T04:23:43+5:30

केज : शहरात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्रामसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने १४ ...

Spontaneous response to Lokmat blood donation in Cage | केजमध्ये लोकमत रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

केजमध्ये लोकमत रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

केज : शहरात ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्रामसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने १४ जुलै रोजी आयोजित रक्तदान शिबिरास शहरातील रक्तदात्यांची उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात महिलांनीही सहभागी होत रक्तदान केले

लोकमतचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्य संग्रामसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत वृत्तपत्रसमूहाच्या वतीने केज शहरात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता भाजपचे नेते रमेश आडसकर, केजचे माजी नगराध्यक्ष पशुपतिनाथ दांगट, गटनेते हारुण इनामदार, संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे, शिवसेना तालुकाध्यक्ष रत्नाकर शिंदे, केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत, हभप समाधान महाराज शर्मा, रोटरी क्लबचे अध्यक्ष बापूराव शिंगण, सचिव अरुण अंजन, रोटरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा हनुमंत भोसले, वैद्यनाथ बँकेचे संचालक प्रवीण देशपांडे, सीता बनसोड, सूर्यकांत चवरे, दादा जमाले, वसंत चाळक, श्रीराम शेटे, संदीप नाईकवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदानाला सुरुवात करण्यात आली. या शिबिरास शहरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या शिबिरासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील रक्तपेढीचे समाजसेवा अधिकारी शशिकांत पारखे, रक्त संक्रमण अधिकारी अभिजित वाघमारे, तंत्रज्ञ रमेश तोगरे, प्रयोगशाळा परिचारक शेख बाबा यांनी रक्तसंकलन केले. याप्रसंगी लोकमत पाटर्नर म्हणून श्री ओम स्टीलतर्फे विशाल जाधवर, अत्तार सुबानी यांच्यासह लोकमतचे अशोक घरत यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरास साने गुरुजी निवासी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कविता कराड, श्रावणकुमार जाधव, प्रहार संघटनेच्या मनीषा लोखंडे, उद्योजक महेश जाजू, भाई मोहन गुंड, सचिन रोडे, अशोक राऊत, श्रीकृष्ण नागरगोजे, दिनकर राऊत आदींसह शहरातील मान्यवरांनी भेट दिली. या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ केज, शिवसेना, संभाजी बिग्रेड, शेतकरी कामगार पक्ष, जनविकास परिवर्तन आघाडी, योगीता बाल रुग्णालयाचे डॉ. दिनकर राऊत यांनी सहकार्य केले.

आर्ट ऑफ लिव्हिंगचा सहभाग; आज बीडमध्ये शिबिर

लोकमतच्या या उपक्रमात श्रीश्रीश्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंगनेदेखील सहभाग घेतला आहे. बीड येथील श्रीश्रीश्री रविशंकर विद्यामंदिर, पिंपरगव्हाण रोड, भक्ती कन्स्ट्रक्शनच्या मागे, जुनी मतिमंद विद्यालय इमारतीत हे रक्तदान शिबिर १५ जुलै २१ रोजी सकाळी साडेदहा ते पाच या वेळेत आयोजित केले आहे. शिष्य, अनुयायी आणि नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा समन्वयक दिलीप कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षक सचिन पिंगळे, मयूरेश गावरस्कर, योगेश नाईकनवरे, मारुती शिंदे, प्रणिता कुलकर्णी, अनिता एरंडे, विश्वनाथ गडकर, साधक प्रज्ञा गायकवाड, सारिका उगले, शर्मिला काळे, पवन झंवर, प्रेरक वैद्य, नीलेश मस्के, सचिन चंदनशिव, संतोष सावंत, संतोष पारगावकर, मंगेश हंसे, जुगलकिशोर जैन आणि श्रीश्रीश्री रविशंकर विद्यामंदिरचे प्राचार्य अनिता सूर्यवंशी, सुरेखा धांडे व सर्व कर्मचाऱ्यांनी केले आहे.

140721\1859-img-20210714-wa0045.jpg

केज शहरातील लोकमत ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करताना भाजपचे जेष्ठ नेते रमेश आडसकर ,नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट ,गटनेते हारून इनामदार,हभप समाधान महाराज शर्मा ,रोटरीचे अध्यक्ष बापूराव शिगन ,सचिव अरुण अंजान ,संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे ,आदी सह उपस्थित मान्यवर.

Web Title: Spontaneous response to Lokmat blood donation in Cage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.