खांडवी येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:25 AM2021-04-29T04:25:07+5:302021-04-29T04:25:07+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना आता घराघरात पसरत चालला आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील ...

Spontaneous response to vaccination campaigns at Khandvi | खांडवी येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

खांडवी येथे लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

Next

कोरोनाचा प्रादुर्भाव हा ग्रामीण भागात दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोना आता घराघरात पसरत चालला आहे. त्यामुळे १८ वर्षांवरील नागरिकांना लस घेणे आवश्यक आहे. लस ही अत्यंत सुरक्षित असून लसीबद्दल समाजात जो काही गैरसमज पसरला आहे त्यावर विश्वास ठेवू नये. या लसीमुळे जरी कोरोना झाला तर त्याचा जास्त परिणाम होत नाही.

याच उद्देशातून मोफत लसीकरण शिबिर घेण्यात येत असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी संजय कदम यांनी लसीकरण केंद्रास भेट दिली असता सांगितले.

यावेळी डॉ. शरद पवार, डॉ. अस्मिता पालखे, आरोग्य सुपरवायझर सुधाकर गव्हाणे, आरोग्य सेवक पुरंदरे, घमाट, आरोग्य सेविका सत्यभामा बनकर, शिल्पा नरवडे, गटप्रवर्तक दीपाली काळे, उषा बारगजे, आशा स्वयंसेविका मीना चव्हाण, रेवती ईतापुरेत, मदतनीस सुधाकर भोले यांच्यासह ग्रामसेवक उनवणे, तलाठी सुपेकर व आरोग्य विभागातील इतर कर्मचारी उपस्थित होते

Web Title: Spontaneous response to vaccination campaigns at Khandvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.