मोकळ्या जागेतील गवतावर तणनाशक फवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:53+5:302021-07-16T04:23:53+5:30

सूर्यफुलाचे तालुक्यात दर्शन नाही शिरूर कासार : तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाचा पेरा जवळपास पन्नास हजार हेक्टरवर केला गेला ...

Spray herbicides on grass in open space | मोकळ्या जागेतील गवतावर तणनाशक फवारा

मोकळ्या जागेतील गवतावर तणनाशक फवारा

Next

सूर्यफुलाचे तालुक्यात दर्शन नाही

शिरूर कासार : तालुक्यात पाऊस समाधानकारक झाल्याने खरिपाचा पेरा जवळपास पन्नास हजार हेक्टरवर केला गेला त्यात कापूस ,सोयाबीन ,तूर ,बाजरी सह अन्य सर्वच वाण दिसत असले तरी सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याने सूर्यफुलाचे दर्शन सुद्धा होत नाही .

आषाढी एकादशी जशी जवळ तसी वारकऱ्यांची तळमळ

शिरूर कासार : आषाढी महावारी आणि पायी पंढरपूर वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी महापर्वणी परंतु गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी वारी चुकत आहे ,जसजसी एकादशी जवळ येत आहे तसतशी वार-याची तळमळ शिगेला पोहाेचत आहे .

सोयाबीन पिकाला पिवळकिची बाधा

शिरूर कासार : तालुक्यात पाऊस वेळेवर पडल्याने यावर्षी सोयाबीन पेरा मोठ्या प्रमाणावर झाला असून मेहनत झाल्यानंतर हिरवेगार दिसत होते मात्र गेली सहा सात दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे सोयाबीन पिकाला पिवळकिची बाधा जडली आहे ,पावसाने उघडीप व कडक उन्हाची गरज असल्याचे शेतकरी सांगतात .

पीक विम्याची मुदत वाढवावी

शिरूर कासार : खरीप हंगामाच्या पीक विमा भरण्याची शेवटची १५ तारीख असली तरी अद्याप अनेक शेतकरी पीक विमा अडचणीमुळे भरू शकले नाही ,पडत असलेल्या पावसाचा धोका लक्षात घेता विमा भरण्याच्या मनस्थितीत शेतकरी आहे त्यासाठी मुदत वाढीची मागणी शेतकरी करत आहे .

Web Title: Spray herbicides on grass in open space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.