पावसाचा शिडकावा, पुन्हा शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:25+5:302021-04-10T04:32:25+5:30
शिरूर कासार : तीन आठवड्यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी सकाळीच पावसाचा शिडकावा आल्याने शेतकरी धास्तावला आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने शेतकऱ्यांची ...
शिरूर कासार : तीन आठवड्यानंतर पुन्हा एकदा गुरुवारी सकाळीच पावसाचा शिडकावा आल्याने शेतकरी धास्तावला आहे. काही दिवसांपूर्वी पावसाने शेतकऱ्यांची भंबेरी उडवली होती. गहू काढणी सुरू झाली आणि पावसाचे आगमन झाल्याने गव्हाने रंग बदलला, तर हरभरासुध्दा भिजला होता. गव्हाच्या उभ्या पिकालाही मार बसला होता. अजूनही काही शेतक-यांच्या शेतात काढणीला आलेला गहू उभा आहे. आता पुन्हा एकदा पावसाची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय पावसाबरोबर वारे आल्यास उन्हाळी बाजरी आडवी होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
भारतीय स्टेट बँकेत गर्दी ओसरली
शिरूर कासार : सतत गर्दीचा विळखा असलेल्या शिरूर येथील भारतीय स्टेट बँकेत मात्र सध्या ‘ब्रेक द चेन’मुळे गर्दी ओसरली आहे. गुरुवारी बँकेत येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमी होते. महत्त्वाचे व्यवहार व कामकाजासाठी आलेल्या ग्राहकांची कामेही नेहमीपेक्षा लवकर झाल्याचा अनुभव त्यांना आला.