दोन दिवसांपासून पावसाचा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:35 AM2021-05-11T04:35:29+5:302021-05-11T04:35:29+5:30
.... ग्रामीण भागात लसीकरणाची झुंबड अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात सहा केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात लस ...
....
ग्रामीण भागात लसीकरणाची झुंबड
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात सहा केंद्रांवरून लसीकरण सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात लस पुरवठ्यात खंड पडला होता. पाच दिवस लस पुरवठा झाला नाही. त्यामुळे अनेकांना हेलपाटे झाले. आता लस पुरवठा सुरळीत झाल्याने पुन्हा भावठाणा, बरदापूर, धानोरा, आपेगाव या ठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे.
...
औषधांच्या नावाखाली काहींची फिरस्ती
अंबाजोगाई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंबाजोगाई तालुका प्रशासनाने कठोर उपाययोजना आखल्या आहेत. शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यात अत्यावश्यक सेवेला सूट दिली आहे. याचाच फायदा घेत काही जण औषधे खरेदी करण्याच्या नावाखाली बाहेर फिरत असल्याचे दिसून येत आहे.
...
महामार्गावर पाणपोई सुरू करण्याची मागणी
अंबाजोगाई : महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन असल्याने महामार्गावर असणारे धाबे, हॉटेल्स बंद आहेत. रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वांनाच पाणी विकत घेणे शक्य नसते. त्यामुळे समाजसेवी संस्था, विविध पक्ष व संघटना यांनी वाटसरूंसाठी महामार्गावर पाणपोई सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
....
प्रवासी निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण
अंबाजोगाई : तालुक्यातील अनेक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रवासी मार्ग निवाऱ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे दिसून येते आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून उभारलेले हे निवारे शासकीय असतानाही त्याचा वापर अनेक ठिकाणी खासगी इमारतींसारखा होऊ लागला आहे. संबंधीत विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.