विजेच्या खांबाला लिंबाच्या झाडाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:34 AM2021-05-09T04:34:33+5:302021-05-09T04:34:33+5:30
शिरूर कासार : मुख्य विद्युत वाहिनी खांबाच्या आधाराने रानावनातून शहरात आणली आहे. मात्र, या लगत असलेल्या ...
शिरूर कासार : मुख्य विद्युत वाहिनी खांबाच्या आधाराने रानावनातून शहरात आणली आहे. मात्र, या लगत असलेल्या लिंबाच्या झाडाने हा खांबच पोटात घेतला आहे. हा संभाव्य धोका दुर्लक्षित करून चालणार नाही. वेळीच दखल घेतली नाही तर पाऊस वारा यामुळे खांब कोलमडून पडल्यास व त्यात वीजप्रवाह सुरू राहिल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी वीज वितरण कंपनीने पावसाळा सुरू होण्यापूर्वीच हे संभाव्य संकट बाजूला करण्याची गरज आहे. याशिवाय लोंबकळलेल्या तारा, वाकलेले खांब ,झाडाझुडपाचा अडसर ,उघडे रोहित्र याकडे दुर्लक्ष करणे धोक्याची नांदी ठरणार आहे. अजून पावसाळ्याला अवधी आहे तो सुरू झाल्यानंतर वीज खंडित करणे हे समीकरण बदलून वीज पुरवठ्यात सातत्य राखण्यासाठी आताच कंपनीने पाऊल उचलावे व पुढील होणाऱ्या त्रासापासून वीजग्राहकाला दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.
===Photopath===
080521\img20210502151101_14.jpg