SSC Exam : मराठीचा पेपर अवघड गेल्याने दहावीच्या मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 03:58 PM2020-03-05T15:58:04+5:302020-03-05T15:58:31+5:30

विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

SSC Exam: Tenth student commits suicide because Marathi paper is difficult | SSC Exam : मराठीचा पेपर अवघड गेल्याने दहावीच्या मुलीची आत्महत्या

SSC Exam : मराठीचा पेपर अवघड गेल्याने दहावीच्या मुलीची आत्महत्या

googlenewsNext

शिरूर कासार (जि. बीड ) : तालुक्यातील कान्होबाची वाडी येथील दहावीच्या वर्गातील एका मुलीने विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. कोमल दिनकर कदम (१६) असे मयत मुलीचे नाव आहे. ती गावातीलच होळकर विद्यालयाची विद्यार्थिनी होती.

मंगळवारपासून सुरू झालेल्या दहावीच्या परीक्षेतील मराठीचा पेपर अवघड गेल्याने तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. नातेवाईक युवराज उत्तम कठाळे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद शिरूर पोलीस ठाण्यात करण्यात आली. दरम्यान माहिती मिळताच ए.पी. आय .रामचंद्र पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. 
 

Web Title: SSC Exam: Tenth student commits suicide because Marathi paper is difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.