ग्रामीण भागातील एसटी सेवा अद्याप ठप्प - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:45 AM2021-06-16T04:45:07+5:302021-06-16T04:45:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अंबेजोगाई : कोरोना संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांत ओसरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कित्येक दिवसांपासून बंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क अंबेजोगाई : कोरोना संसर्गाचे संकट गेल्या काही दिवसांत ओसरू लागले आहे. या पार्श्वभूमीवर कित्येक दिवसांपासून बंद असलेला एसटीचा प्रवासही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. असे असले, तरी ग्रामीण भागात एसटी सेवा अद्याप ठप्प आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, अडचण दूर करण्याची मागणी जोर धरत आहे. निर्बंधातून शिथिलता मिळाल्यानंतर, अंबेजोगाई आगाराची बस अंबेजोगाई ते पुणे, औरंगाबाद, अमरावती, लातूर, परळी, अहमदपूर यासह इतरही विविध जिल्ह्यांकडे धावू लागली आहे. मात्र, पाच महिन्यांनंतरही ग्रामीण भागाकडे एसटीची चाके वळलेली नाहीत. एसटी अद्याप बंद असल्याने, शेतकऱ्यांना तालुका, जिल्हास्तरावर ये-जा करण्यासाठी गैरसोय होत आहे, तसेच दिव्यांग व्यक्ती, वृद्ध नागरिक, आजारी रुग्ण, मजूर आदींना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून, अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ... नियमांचे पालन करू, एसटी सुरू करा ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करण्यात यावी, आम्ही नियमाचे पालन करू, असा सूर अकोला, धारूर, मुडेगाव, बरदापूर, येलडा, राडी, धानोरा, वांगदरी, भावठाणा, आपेगाव, लिंबगाव यांसह इतरही अनेक गावांमधील प्रवाशांमधून उमटत आहे. ... एसटी सेवा बंद असल्याने बाहेरगावी ये-जा करता येणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक जण जीव धोक्यात घालून खासगी वाहनांनी प्रवास करीत आहेत. नागरिकांच्या खिशालाही यामुळे झळ बसत असून, ग्रामीण भागात एसटी सेवा पूर्ववत करावी. - मधुसूदन कुलकर्णी, मुडेगाव. ....