ST Strike: 'संपाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा'; पंकजा मुंडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 07:02 PM2021-11-12T19:02:42+5:302021-11-12T19:05:13+5:30

ST Strike: .राज्यात सुरू असलेल्या संपादरम्यान नाशिक, पाथर्डी आणि आज परळी येथे संपकऱ्यांची भेट.

ST Strike: 'Strike should be considered sympathetically'; Pankaja Munde visited ST staff | ST Strike: 'संपाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा'; पंकजा मुंडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीला

ST Strike: 'संपाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा'; पंकजा मुंडे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांच्या भेटीला

Next

परळी : राज्यातील परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत राज्य सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करायला हवा,कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत,त्या कशा सोडविता येतील याबाबत सरकारने गांभीर्याने विचार करावा असं भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटलं आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज परळी आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांच्या संपाप्रति आपली सहानुभूती असल्याचे सांगितले.राज्यात सुरू असलेल्या संपादरम्यान मी नाशिक,पाथर्डी आणि आज परळी येथे संपकऱ्यांची भेट घेतली आहे,एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी संपकरी काही  कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या,परंतु कुणीही त्यांची दखल घेत नाही, त्यांचे म्हणणे तरी ऐकून घ्यायला हवे असे त्या म्हणाल्या.  परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाला माझी पूर्ण सहानुभूती असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: ST Strike: 'Strike should be considered sympathetically'; Pankaja Munde visited ST staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.